*वाणीसंगम शाळेत सार्वजनिक शिवजयंती साजरी*
सोनपेठ(राजेश खेडकर)जि.प.प्रा.शा.वाणीसंगम शाळेत आज अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी बालशिवराय,जिजाऊ,डाँ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई,अहिल्याबाई यांच्या रुपातील चिमुकल्यांची गावात फेरी काढण्यात आली.यावेळी गावातील सर्व जातीधर्मातील लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.वयस्कर जेष्ठ माणसांनी मुलांबरोबर ढोल ताशा व हलगीच्या तालावर लेझिम खेळला.गावांतील चौका चौकांत प्रभात फेरी दरम्याण गावकऱ्यांतील माता भगीनींनी महामानवांची पुजा केली.शिवरायांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी मावळ्यांसाठी स्वराज्य निर्माण कले,त्यावेळी सर्व समाज सुखाने नांदत होता.तोच आदर्श आज सर्व वाणीसंगम करांनी या जयंतीतील उत्साहात सहभागी होऊन दाखवला.यावेळी शाळेच्या शिवजयंती फेरीत गावचे सरपंच बाबुराव काळे,उपसरपंच विलास वाघमारे,ग्रामसमिती अध्यक्ष संदिपान झिरपे,माजी सरपंच श्रिराम झिरपे,विलास काळे,सदस्य कल्याणराव वाघमारे,पोलिस पाटील शेषेराव चव्हाण, चंद्रकांत झिरपे,प्रताप शेळके,मुरली पायघन,रवी वाघमारे,अरुण काळे,बिरूबा काळे,प्रशिक मित्रमंडळ,सार्वजनिक शिवजयंती,शिव गर्जना ग्रुप या मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरीचे तालुका प्रतिनीधी गणेश पाटील, लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुभाष सुरवसे,जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे बालासाहेब इंगोले,ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेशजी खेडकर हे उपस्थित होते.
प्रभात फेरी दरम्यान गावकर्यांनी मुलांना जागोजागी खाऊ व पाणी याचे वाटप करून सामाजीक एकतेचे दर्शन घडवले.प्रभातफेरीचे आकर्षण ठरले ते गावातील शाळकरी मुलींचे लेझिम पथक व वडिलधारी मंडळींचा लेझिम मध्ये घेतलेला सहभाग.
यावेळी कार्यक्रम सांगता करताना शाळेचे मुख्याध्यापक डि.के.पवार,जेष्ठ शिक्षक नागनाथ जाधव यांनी शिवजयंती विषयी मार्गदर्शन केले.तर सर्व मान्यवर व गावकऱ्यांचे आभार संतोष डांगे यांनी मांडले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें