शिवजयंती निमित्त भोकरदन मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन :राहुल देशमुख
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधि : दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण शहरात जानेवारी महिन्यात शिवजयंतीची कार्यकारणी घोषित करण्यात आली व युवा नेतृत्व राहुल देशमुख यांना अध्यक्षपदि नियुक्त करण्यात आला.भोकरदन मध्ये शिवजयंती निमित्त शहरात पहिल्यांदाच असा अगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात येत आहे.या कार्यक्रमात सर्वच तरुण मिळून काम करतांना दिसत आहे व राहुल देशमुख यांच्या नियोजनाचि शहरात चांगलीच चर्चा होत आहे कारण शहरात पहिल्यांदाच युवक अध्यक्ष झाल्याने युकांनमध्ये उत्साहाचे वातावरण आहे व असे कार्यक्रम होत आहे .शिवजयंतीचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केलेले आहे.१५ फेब्रुवारी रोजी सुप्रसिध्द व्याख्यानकर्ते सुबान अली साहेब यांच्या वनितुन समाज प्रबोधन कार्यक्रम नगरपरिषदे समोर संध्याकाळी ७ वा.आणि दि.१६ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्ररोग निदान शिबिर मोफत मोतीबिंदु शस्रक्रिया, १७ फेब्रुवारी वकृत्व स्पर्धा न्यू हायस्कूल भोकरदन येथे व १९ फेब्रुवारी सोमवारी जयंती उत्सव मुख्य सोहळाचे आयोजन केले आहे.सर्व समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें