- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 फ़रवरी 2018

नवजात शिशुची चाेरी

बाळाची शोधाशोध सुरू

सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयात नवजात शिशुची चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आला. उपजिल्हा रूग्णलायात सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

25 वर्षीय महिला ही मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झाली होती. प्रसुती मध्यरात्री होऊन महिलेला मुलगी झाली होती. बुधवारी नातेवाईकांनी महिलेची सकाळी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. सायंकाळी महिलेसोबत तीची आई या दोघीच सायंकाळी 5 च्या सुमारास रूग्णालयात होत्या. प्रसुती झालेली महिला सायंकाळी 5 च्या सुमारास अशक्तपणा आल्यामुळे ती झोपी गेली. शेजारी बाळही होते. महिलेची आईजवळ असतांना एक बुरखाधारी महिला आली. बाळंतीणीची आईला बुरखाधारी महिलेने गप्पामध्ये व्यस्त करून नजर चकुवुन बुरखाधारी महिलने नवजात शिशु चोरून नेल्याचे नातेवाईकांनी सागितले. बुरखाधारी महिलेने डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ घातल्याचे बाळंतणीच्या आईने सांगितले. या घटनेची माहिती सिल्लोड शहर पोलीसांना मिळाली असून पोलीस यासंदर्भात बाळाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सीसीटीव्ही फक्त नावापुरते

रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत परंतु त्यातील काही कॅमेरे निकामी झाले आहेत. सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे पोलीसांना काही मदत मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें