- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जनवरी 2018

जिजाऊ प्रतिष्ठाण च्यावतीने तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
----------------------------------------------------------------------

सोनपेठ(राजेश खेडकर)
सोनपेठ शहर व तालुक्यातील सर्व अनुदानित व विना अनुदानित खाजगी व जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विवीध कलागुनांणा वाव मिळऊन देण्याच्या हेतुने येथील जिजाऊ प्रतिष्ठाण च्यावतीने राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सवाचे औचीत्य साधुन तालुका स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी असुन या स्पर्धा पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात  येनार आहेत. या स्पर्धेसाठी गटनिहाय खालील प्रमाणे विषय देण्यात आले आहेत-
(१) वक्तृत्व स्पर्धाः-
-----------------
*विषय १ली ते ५वी साठी विषय
अ) जिजाऊ एक आर्दश माता ब) मी आणि माझे गाव क) जिजाऊ आणि आजची स्त्री.
*६वी ते १०वी साठी विषय
अ) जिजाऊ स्वराज्य संरक्षक ब) मी आणि माझे गाव क) जिजाऊ आणी आजची स्त्री  सहभागी विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी पाच मिनिटाचा वेळ असेल.

(२)निबंध स्पर्धा:-
-----------------
वक्तृत्व स्पर्धेचेच विषय निबंध स्पर्धाना असतील यासाठी शाळास्थरावर निबंध स्पर्धा घेण्यात येनार असुन संबंधित शाळांनी शाळेतील निवडक तीन विद्यार्थ्यांचे निबंध कार्यक्रमात पाठवावेत असे संयोजन समितीने कळविले आहे. कार्यक्रमाची तारीख १९ जानेवारी २०१८ ठरविण्यात आली आहे. स्पर्धेच्या अधिक माहिती साठी  मो. 9011623400 व 8830210389 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त शाळानी सहभागी व्हावे असे अवाहन जिजाऊ प्रतिष्ठाण च्यावतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें