- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 21 जनवरी 2018

शोषणमुक्त समाज निर्माणासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत -- डाॅ विलास मोरे

सेलू :-  नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करा. बदलत्या वेळेनुसार कार्यकर्तांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी. सामान्य नागरिकांच्या लहान-मोठ्या समस्या समजून घेत त्या कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे. त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहोरात्र काम करत आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांनी सेलू येथे केले. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने सेलू तालुक्यातील कार्यकर्यांची बैठक व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार घेतला. यावेळी डाॅ.विलास मोरे, पंकज निकम, शिवाजी गजमल, औषध विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संदीप टाक ,  कैलास का,  सुनिता घांडगे, अश्विनी घोगरे, शिवाजी आकात, अशोक कोपुलवार, यागेश काकडे, सुंदर पौळ, सतिष पौळ, बाळासाहेब काष्टे  आदी उपस्थित होते. डाॅ. मोरे पुढे म्हणाले की शौचालय किंवा घरकुलांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करणे, सातबारामध्ये असलेल्या चुकांची दुरूस्तीची समस्या, निराधार महिलांना न्याय मिळत नाही, शहरात दलालांकडून सामन्याची लूट केली जात आहे, राशनकार्ड मिळत नाही व इतर समस्या जर स्थानिक स्तरावर ठिक केल्या जात नाही. अशा तक्रारी जनता दरबारापर्यंत पोहोचल्या तर ही गंभीर व खेदजनक बाब आहे. आज भाजप सरकार कडून सर्व सामान्य लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. परंतु शहरात ठिकठिकाणी दलालांचा विळखा पडला असल्याने नागरीकांची उघड लूट होत आहे. निराधार महिलांच्या पगारीवर डल्ला मारण्यापर्यंत या दलालांची मजल गेली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकर्तांनी सजग राहून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे. शोषणमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे हाच मुद्दा घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहोरात्र परिश्रम घेत आहे. तेव्हा कार्यकर्तांनी निश्वार्थ भावनेतून कार्य पुढे न्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

चौकट.....

◾अरूण देशपांडे खंबीर नेतृत्व....

स्वातंत्र्यानंतर आजही सर्व सामान्य माणसाला न्याय मिळेनासा झाला आहे. पावलोपावली भ्रष्टाचार, महागाई व वाढलेल्या बेरोजगारीमुळे समस्या अधिकच गंभीर होत आहेत. सामन्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशा वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी चारित्र्यशील लोकांना एकत्र करून शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी एक प्रभावी लढा उभा केला आहे.

पुर्ण....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें