- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ  खो-खो स्पर्धेत औरंगाबाद, भारतीय पुणे विद्यापीठ,उ.म . जळगाव , विजयी घौडदौड*

समशेर खान.

सेलू : येथील नूतन महाविद्यालय,सेलू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या  उद्घाटन नंतर  कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी  ,नूतन महाविद्यालय मैदान सेलू येथे डॉ. बा.अ.म.औरंगाबाद, भारतीय पुणे, उत्तर म.जळगाव, राणी दुर्गावती जबलपूर  विद्यापीठ संघाची विजय घौडदौड .
डॉ. बा.अ.म. वि. औरंगाबाद  विद्यापीठ ने 11 गुणाने महाराजा वि.बडोदा संघाचा पराभव केला यात घोडके दिपक ने 3:20 मि. संरक्षण करत 3 गडी बाद केले. इंगळे अक्षय 5 गडी बाद केले.
राज्यस्थान विद्यापीठ  जयपुर संघानी  11 गुणांनी कच्छ विद्यापीठ पराभव केला यात ग्यान प्रकाश शर्मा ने 4 गडी बाद केले तर दिलीप 2:20 मि. संरक्षण करत 2 गडी बाद करून विजय प्राप्त केला .
देवी आहिल्या इंदोर विद्यापीठ ने 24 गुणांनी जयनारायण जोधपूर विद्यापीठा चा एकतर्फी पराभव करत  विजय प्राप्त केला यात प्रसाद झाल्टे  ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन 2:20 मि.संरक्षण करत 8 गडी बाद केले.
कुडी विद्यापीठ गांधीनगर वि. इंडियन टिचर गांधीनगर दरम्यान अतितटीची लढतीत 1 गुणांनी, ठक्कर उमेश 2:20 मि.संरक्षण करत 7 गडी बाद करून विजय प्राप्त केला.
एस.जी.बी.विद्यापीठ अमरावती च्या आकाश कुंबडे ने 2:50 मि. संरक्षण केले, तर लोकेश रामगिरी नी 3 गडी बाद करत स्वराष्ट्र विद्यापीठ राजकोट चा 9 गुणांनी पराभव केला.
अतिशय रोमंहर्षक लढतीत सोलापूर विद्यापीठ च्या अमोल केदार ने 1:50 मि. संरक्षण करत 4 गडी बाद करत ,1 गुणांनी गुजरात विद्यापीठ अहमदाबाद ला पराभूत केले.तर भारतीय पुणे विद्यापीठ च्या प्रितम चौगुले ने 2:40 मि. संरक्षण करत 4 गडी,तर रोहित कांबळे 2:00 मि. संरक्षण करत 4 गडी बाद करून 7 गुणांनी गोवा विद्यापीठ चा पराभूत केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघाने 7 गुणांनी कोटा विद्यापीठ पराभव केला यात निरंजन ढरवे ने 3:40 मि. संरक्षण करत 3 गडी बाद केले.
डॉ. बा.अ.म.विद्यापीठ औरंगाबाद संघाचा अतितटी लढतीत  6 गुणांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन चा पराभव केला यात इंगळे अक्षय 5 गडी तर कचरे वरद 6:30 मि. नाबाद संरक्षण करून अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन सेलू करांना पाहण्यास मिळाले.स्पर्धा निरीक्षक काका पाटणकर,
पंच प्रमुख डॉ. युसूफ पठाण,विरेंद्र भुबड, प्रभाकर काळे ,रणजित जाधव, राम चोखट, प्रकाश टाकळे, अँड.महेश ढोंबळे, अमोल मुरकुटे, हे काम पाहत आहेत.
स्पर्धा यशस्वी तेसाठी    प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी व क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा.डॉ. माधव शेजुळ,  प्रा.के.के. कदम, प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी. सोन्नेकर , गणेश माळवे, डॉ. व्यंकट माने, डॉ. नागनाथ गजमल,प्रा.विनोद गणार्चाय ,प्रा.पवन बारहत्ते, सुरेश हिवाळे, प्रा. शाम गरड,प्रा. हेमंतराज हडसनकर,काम पाहत आहेत.

छाया=शंभु काकडे सेलू.>>

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें