प्रत्येक विद्यार्थी प्रगत आसावा
अनिल नखाते यांची सुचना
शाळा व्यवस्थापन समिती बैठक संपन्न्
सेलू (प्रतिनीधी )
मार्च अखेर आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रगत आसला पाहीजे यासाठी शाळा व्यवस्थापन समीती सदस्यांनी लक्ष द्यावे अशी सुचना वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांनी केली .
जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती सौ भावनाताई नखाते यांनी सेलू तालूक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत एकाच दिवशी म्हणजे १३ जानेवारी रोजी शाळा व्यवस्थापन समीती ची बैठक घेण्याचे आदेशित केले होते .त्या अनुषंगाने श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळा वालूर येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजीत केली होती .त्या बैठकित व्यवस्थापन समीती चे अध्यक्ष तथा संस्थाप्रमुख अनिलराव नखाते बोलत होते .
यावेळी उपाध्यक्षा सौ द्रोपदाबाई गायकवाड ,सचिव तथा मुख्याध्यापक श्याम मचाले व सर्व सदस्य उपस्थीत होते .
यावेळी बोलतांना अनिल नखाते म्हणाले की शाळेची प्रगती ,भौतीकसुविधा ,व नियोजन आराखडा यामध्ये व्यवस्थापन समितीचे महत्वाचे योगदान असते .समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे . तसेच प्रगत महाराष्ट्रा चे उद्देश पुर्ण करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञान अवगत केले पाहीजे असेही नखाते म्हणाले
मार्च २०१८ पर्यंत एक ही विद्यार्थी अप्रगत राहता कामा नये अशा सक्त सुचना श्री नखाते यांनी दिल्या .
शैक्षणिक प्रगती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले तर संजय वाशिंबे यांनी आभार मानले .
आदेशाची आशीही आमलबजावणी ........
सर्व माध्यमाच्या शाळेत तालूक्यात एकाच दिवशी बैठक घ्यावी असे जि.प.शिक्षण सभापती सौ भावनाताई अनिलराव नखाते यांनी दिले होते त्या प्रमाने सेलू तालूक्यात सर्व शाळामधून याची आमलबजावणी केली विशेष बाब म्हणजे वालूर येथील शांताबाई नखाते आश्रमशाळेत सुध्दा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांचे पती संस्थाप्रमुख अनिलराव नखाते हे ही बैठकीस उपस्थीत राहीले त्यामुळे सौ चा आदेश श्री नी पाळून एक आदर्श समाजासमोर ठेवला आसेच म्हणावे लागेल .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें