- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

पत्रकारांच्या सहकार्यामुळेच राजकारणात यशस्वी झालो-टेंगसे

पाथरी/प्रतिनिधी:-मोठे बंधू राजकारणात सक्रीय असल्याने राजकारणाचा अनुभव होताच या शिवाय आपण मी आयुष्यात प्रशासकीय सेवेत जावं हीच माझी आणि वडिलांची इच्छा होती पिएसआय म्हणून नौकरी मिळाली असतांना वडिलांनी ती करू दिली नाही आणि इतर ठिकाणचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत त्या मुळे 1996 साली राजकारणात ग्रामपंचायत निवडणूकी पासून सुरूवात केली आणि संपुर्ण ग्रामपंचायत ताब्यात मिळवली या नंतर कारखाण्याच्या पाच मताचा एकमेव पराभव अनुभवला आणि आपणा पत्रकारांच्या सहकार्यानेच आज जिल्हाभरात यश मिळाले ते केवळ आपणा मुळेच असे राजकारणातील यशस्वीतेचे गुपित माजी जि प सभापती दादासाहेब टेंगसे यांनी दर्पण दिना निमित्त त्यांच्या निवासस्थानी पाथरी येथे आयोजीत सत्कार कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
या वेळी या कार्यक्रमा साठी जि प सदस्या मिराताई दादासाहेब टेंगसे, जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्सक्ष सदाशिव थोरात, माजी पं स सदस्य लक्ष्मण दुगाने, तुकारामजी पौळ यांची उपस्थिती होती. या वेळी जि प सदस्या मिराताई टेंगसे ,आणि दादासाहेब टेंगसे यांच्या वतिने पत्रकारांना शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली, या। कार्यक्रमाचे सुत्र संचलन तुकाराम पौळ यांनी केले तर आभार सदाशिवराव थोरात यांनी मानले.
सपोर्ट फार्मर्स कंपणी कडून सत्कार
सपोर्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपणीच्या वतिने सदाशिवराव थोरात आणि पं स सदस्या कल्पनाताई थोरात यांच्या वतिने पत्रकारांचा पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचलन कंपनीचे कार्यकारी संचालक गजानन घुंबरे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें