शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत.
प्राणीसंग्राहलयाच्या संचालकास राष्ट्रवादीचा घेराव.
औरंगाबाद (प्रतिनिधी)औरंगाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महानगर पालिका पशुसंवर्धन विभाच्या संचालकाचा घेराव करण्यात आला.शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत माजवली असतांना देखील प्रशासन गाढ झोपेत असल्याने त्याचे गंढीर परीणाम पाहायला मिळाले.शहरातील रहेमानीया काॅलनी,किराडपुरा,व शिध्देश्वर काॅलनी अशा विविध वसाहतीमध्ये मोकाट कुत्र्यांनी पंधरा ते वीस मुलांना चावा घेतला.त्यातील काही मुलांना गंभीर जखमा झाल्या होत्या.या सर्व मुलांना शासगीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.इतके मोठे गंभीर प्रकरण शहरात घडून देखील प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचां-यानी साधे पाहणी करण्याची तसदी घेतली नाही.करीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी संचालकांचा घेराव करून त्यांना जाब विचारला.संचालक नाईकवाडे यांनी आम्ही यंत्रणा कामाला लावली असून कारवाई सुरू आहे.परंतु आम्हाला अॅनिमल वेलफेअर बोर्डचे बंधन आहेत असे सांगितले.संतप्त पदाधिका-यांनी पाहणी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी तत्काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यासोबत शासकीय रूग्णालयात रूग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली.व वैद्यकीय अधिक्षकांना भेटून औषधांची विचारपूस केली.व रेबीजची लस तात्काल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.घेराव घालण्याचे आंदोलन *शहर सचिव तय्यब खान* यांच्या नेतृवाखाली व मराठवाडा *सचिव जावेद खान*,व शहर *कार्याध्यक्ष पुर्व शाकेर खान* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या वेळी अल्पसंख्याक कार्याध्यक्ष जावेद खान,शहर महासचिव उमर पटेल,महासचिव शेख रफीक,शहर उपाध्यक्ष(सो.मी)शेख नवाज, शहर सरचीटनीस अमोल गवळे,ओबीसीचे संदीप घोडके,शहर सचिव (मध्य)इमरान मलीक,महिला शहर अध्यक्षा मेहराज पटेल,प्रदेश महासचिव सलमा बानो,मध्य अध्यक्षा शमा परवेज,उपाध्यक्षा अनिसा बाजी,शोभा गायकवाड,सय्यद सरताज,अदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार, 6 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें