- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

*एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची तोडफोड करु नका…!*

*- दिवाकर रावते याचे आंदोलकांना आवाहन*



*मुंबई : (दि.02 जानेवारी) *

*"एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करुन सर्वसामान्य माणसांचे
दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका." असे भावनिक आवाहन परिवहन व खारभूमी
विकास मंत्री तथा, एस.टी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दिवाकर रावते यांनी
आंदोलनकर्त्यांना केले आहे.*

भीमा कोरेगांव संदर्भात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री.रावते
यांनी आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य असला
तरी त्या व्यक्त करीत असतांना "सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे हक्काचे साधन
असलेल्या एसटीला वेळोवेळी आंदोलकांकडून 'लक्ष्य' केले जाते. त्यामुळे दररोज
एसटी वर अवलंबून असणारी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.
एसटीचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्यापेक्षा प्रवाशांना होणारा त्रास अत्यंत
विदारक असून कृपयास आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला
लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये" असे भावनिक आववाहन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें