- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 जनवरी 2018

रुढि पाटिजवळ झेंडा लावण्या वरुन वाद,ना.त.वाघुंडे यांनी दखल घेत वाद मिटवला.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.११: मानवत तालुक्यातील रुढि पाटीजवळ परभणीकडे  जाणारा नविन बायपास रोड होत असुन या ठिकाणी राञीच्या वेळेस अज्ञात व्यक्तिनी तीन विविध जाती धर्माचे झेंडे लावल्याचे दि.११ जानेवारी रोजी  सकाळी निदर्शनास आल्यानंतर वाद निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
या विषयी प्राप्त माहितीनुसार रुढि पाटिजवळ परभणीकडे जाणाऱ्या नविन बायपास रोडाचे काम सुरु असुन या  चौकाच्या ठिकाणी दि.१० जानेवारी रोजी राञीच्या वेळेस एका समाजाच्यावतीने येथे एक झेंडा लावण्यात आला व या नंतर याच ठिकाणी दुसऱ्या समाजाकडुन झेंडा लावण्यात आला व लगेच हे दोन झेंडे बघुन तिसऱ्या समाजाकडुन हि झेंडा राञीच्या वेळेस लावण्यात आला.
याची माहिती प्रशासनास मिळताच  याची दखल ताबोडतोब  तहसिल प्रशासनाचे कार्यदक्ष नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी घेत पोलीस प्रशासनासोबत घटनास्थळी धाव घेत वाद वाढण्याच्या अगोदरच सामजस्यांने सर्व जाती धर्मातील लोकांना व लोकप्रतिनिधीना घटनास्थळी बोलावून झेडेच्या विधीवध पध्दतीने पुजा करुन तीन्ही झेंडे विसर्जित करुन सामजस्यांने हा वाद वाढविण्या अगोदर  मिटविला व घटनेचा पंचनामा केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें