वाचन संस्कृती जोपासन्याचा अनोखा प्रयत्न
---------------------------------------
सौ.कांताबाई शहाणे यांनी हळदी-कुंकाच्या वाणात वाटली पुस्तके
----------------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
मकरसंक्रांती निमित्त महिलावर्गात वाणात विविध गृहोपयोगी वस्तू वाटण्याची प्रथा पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे. याप्रसंगी महिला एकमेकींना भेट वस्तु आवर्जुन देत असतात. यात नित्योपयोगी येनाऱ्या वस्तुंचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु मकरसंक्रांती दिनी कोनी 'वाण म्हणुन पुस्तके वाटली' असे म्हटल्यास नवल आश्चर्य वाटने साहजिक आहे. परंतु असे घडले आहे.
औरंगाबाद महानगरच्या गारखेडा परिसरातील हनुमान नगर येथील रहिवासी असलेल्या श्री.विष्णुपंत शहाणे यांच्या सुविद्य पत्नी सौ.कांताबाई शहाणे व दोन सुना सौ.निर्मला भगवानराव शहाणे व सौ.कंचन संतोष शहाणे या वाचनप्रिय कुटुंबियांनी वाणावर होनारा खर्च अशाप्रकारे विधायक कार्यासाठी खर्च करुन लोप पावत असलेली वाचन संस्कृती पुनर्जीवित करण्यासाठी वापरला. यावेळी सौ.पुष्पा टाक, सौ.अर्चना मेहेर, सौ.कमलाबाई राजपुत, सौ.वंदना राजपुत, सौ.छबुबाई राठोड, सौ.कासाबाई मुळे, सौ.लिलाबाई नरोडे, सौ.लक्ष्मीबाई हरणे, सौ.निर्मलाबाई एकलारे आदींना पुस्तकांचे वाण दिले तर हळदी-कुंकाच्या कार्यक्रमास घरी येनाऱ्या १५१ महिलांना पुस्तके देण्यात येनार असल्याचे सौ.कांताबाई शहाणे यांनी सांगीतले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कुटुंबीयांनी यापुर्वी नातलगाच्या विवाह प्रसंगी व वाढदिवसा निमित्तही शाळांना पुस्तके भेट दिली आहेत. घरगुती कार्यक्रमातुन वाचन संस्कृती जोपासन्याचे प्रयत्न भविष्यात वाचन संस्कृती वाढीस मदत करतील यात शंका नाही.
अशाप्रकारचे उपक्रम गावोगावी राबविली जाने ही काळाची गरज असल्याचे मत सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी व्यक्त केले आहे.
रविवार, 14 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें