आमठाणा राष्ट्रीय पेयजल योजना समितीच्या अध्यक्षपदी दिलीपराव दानेकर
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून आमठानासाठी जवळपास 1 कोटी चे कामे होणार
आमठाणा-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेत सरपंच संजय बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली रंगनाथ पाटील कदम यांनी राष्ट्रीय पेयजल योजना समितीच्या अध्यक्षपदासाठी दिलीपराव सखाराम दानेकर यांचे नाव सुचवले त्यास सचिन चौधरी यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते राष्ट्रीय पेयजल योजना समितीच्या अध्यक्षपदी दिलीपराव सखाराम दानेकर यांची निवड करण्यात आली ही निवड आमठाणा गाव वाडी, वस्तीच्या पाणीपुरवठा योजना शासनाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून गावात राबवली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे या अगोदर ह्या योजनेचे सरपंच पदसिध्द अध्यक्ष असायचे मात्र आता शासनाच्या नियमानुसार अध्यक्ष ची निवड ही ग्रामसभेतून करण्यात येते त्या नियमानुसारच निवड करण्यात आली
या वर्षी आमठाना गाव, वस्ती च्या पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास 1 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे त्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटूंबापर्यत शुद्ध पेयजल पोहवचवण्यचे काम होणार आहे तसेच नवीन किंवा अस्तित्वातील विहिरींचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, हातपंप,लघु नळ पाणी पुरवठा योजना राबविणे अस्तित्वातील योजनांची दुरुस्ती करणे अश्या प्रकारचे उपक्रम पेयजल योजनांच्या माध्यमातून गावात राबवले जाणार आहे यामुळे गावातील तसेच वाडी वस्ती वरील जनतेला पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे यामुळे लोकांचे शुद्ध पेयजलामुळे आरोग्य सुध्दा चांगले राहणार आहेत
यावेळी उपसरपंच भागवत पाटील मोरे, अंबादास चौधरी, संतोष दिवटे, पंढरीनाथ कदम, पंढरीनाथ सोमासे, रघुनाथ कदम, लष्मण डफल, रघुनाथ मोरे, पांडुरंग पाटील कदम, उत्तम मोरे, राजू कदम, रामजी खरात, सुभाष लोखंडे, याची उपस्थिती होती या निवडीबद्दल यांनी अभिनंदन केले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें