अर्ध्या शहराची तहान भागविणाऱ्या वसाहतीच पाण्यापासून वंचित - राष्ट्रवादीचे महापौरांना निवेदन
औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबाद शहरातील हर्सुल तलावा लगत असलेल्या सईदा कॉलनी आणि वार्ड क्रमांक 4 व 5 मधे पाणी पूरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महापौर यांना निवेदन देण्यात आले "तळ उषाला कोरड घशाला" अशी अवस्था असलेल्या दहा हजार नागरिक पाण्यापासून वंचित आहेत हर्सुल तलावा लगत असलेल्या सईदा कॉलनी या वर्डात जलशुद्धीकरण केंद्र असून शहरातिल बाविस वॉर्डाना येथून पाणी पुरवठा होतो अर्ध्या शाहराची तहान भागवीणाऱ्या परिसरालाच पाण्या पासून वंचित राहावे लागत आहे येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून प्रशासनाचे यावर दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे करिता त्वरित या वसाहती मधील नागरिकांना न्याय मिळावा करिता महापौरांनी जातीने लक्ष घालून कारवाही करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आशयाचे निवेदन महापौरांना देण्यात आले या प्रसंगी निवेदन देतांना शेख इमरान शहर सचिव मध्य विधानसभा, जावेद खान मराठवाडा चिटणीस, विलास मगरे शहराध्यक्ष सोशल मिडीया, शहर सचिव तय्यब खान, उपाध्यक्ष शेख नवाज, महिला पदाधिकारी शहर उपाध्यक्ष मंजुषा पवार, शमा परवेज, सय्यद सरताज आदींची यावेळी उपस्थिति होती....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें