- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 जनवरी 2018

वाळलेल्या झाडाची फांदी अंगावर पडून ७५ वर्षीय वृद्धा चा  जागीच मृत्यू

भोकरदन पोलीस ठाण्यात असेच एक झाड असून  असाच दुसरा अपघात होण्याची शक्यता  

भोकरदन प्रतिनिधी

भोकरदन मधील असलेले डॉ सावंत हॉस्पिटल समोर एक जुने पिंपळाचे झाड पूर्ण पाने म्रत अवस्थेत झाले आहे पूर्ण झाड वळून भुगा होईल इतके कमकुवत आहे मात्र संबधित अधिकार्याच्या दुर्लक्षामुळे आज एका वयवृद्धा ला आपले प्राण गमावा लागले आहे मिळालेली माहिती नुसार कि स्व मंदाभाऊ रामा इंगळे हे रोज या रस्त्याने येत जात होते व त्या झाडाच्या आवारात केलेला वाट्यावर ते थोडा वेळ आराम करत असे मात्र आज दि ०८ जानेवारी रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मंदाभाऊ हे थोडा वेळ बसून तिथून निघतच अचानक वरून फांदी तुटण्याचा आवाज येताच त्याच्या डोक्यावर येऊन पडली त्यात मंदाभाऊ यांचा जागीच मृत्यू झाला तितक्यात सावंत  हॉस्पिटल मध्ये असलेली  नर्स पुष्पा कानड्जे या महिले ने आरडा ओरडा करून जवळ असलेल्या नागरिकांना बोलावले व त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले मात्र प्रथम उपचारासाठी असेले डॉ देशमुख यांनी त्यांना मयत  घोषित केले आहे यांच्या पश्चात मुले  पत्नी कोणी नसल्याने यांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक तुकाराम इंगळे हे करीत होते यांच्या जाण्याने इंगळे परिवारात दुखः वातावरण झाले असून तत्यांचा अंतिमविधी आज दि ०९ जानेवारी २०१८ रोजी तुकाराम इंगळे यांच्या शेतात सकळी १० वाजता  होणार आहे

या पूर्वी अशीच एक घटना पोलीस ठाण्यातील असलेले जाड  हे कमकुवत आहे अशा घटना दोन वेळा या ठिकाणी एका दुचाकी स्वार च्या अंगावर व पोलीस ठाण्यात असेले होमगार्ड हरून शैख याच्या अंगावर देखील पडली होती मात्र ते दोघेही किरकोळ जख्मी झाले होते  मात्र संबंधित अधिकार्याने या कडे कानाडोळा केला असल्याचे समजत आहे तत्काळ हे दोन्ही झाडे तोडण्यात यावे नसता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे      

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें