- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 जनवरी 2018

भोकरदन शहरातील बेकादेशिर उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई..

  १० गाड्यांवर कारवाई करून एक कोर्टात केली जमा..

   प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन शहरात रोड वरच वाहने उभे करत असल्याने जड वाहनांना जाण्या-येण्यासाठी आडचण होत असल्याणे नेहमीच ट्राफीक जाम होत होती,याचीच दखल घेत भोकरदनचे पोलिस निरिक्षक दशरत चौधरी यांच्या पथकाने सोमवारी रोडवर बेकायदेशिर रित्या उभे असलेल्या ११ मोटारसाईकली नगर पालिका व पोलिसांच्या मदतीने गाड्यावर कारवाई करून,२४००  रुपये नो पार्कींचा दंड वसुल करण्यात आला आहे.
   भोकरदन शहरातील जालना रोड वरील शिवाजी पुतळा,हैदराबाद बॅंक,महाराष्ट ग्रामिण बॅंक,गणपती बॅंक,मलकापुर बॅंक,तसेच सिल्लोड रोडवरील कोर्ट परिसर,चिखली बॅक,बॅंक आॅफ महाराष्ट,अदि ठिकाणी ग्राहकांनी वर्दळ असल्याने ,नेहमीच या ठिकाणी ट्राफीक जाम होत असते.तसेच  नागरीकांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात रोडवर उभ्या राहात असल्याने,जड वाहनांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते,आणि या वाहनांमुळे गर्दी होत असल्याने ट्राफीक वेळोवेळी जाम होत होती.
   यांचीच दखल घेत भोकरदन पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दशरत चौधरी,यांच्या पथकानी सोमवारी ११ वाजेपासुन बेकायदेशिर जागेवर उभ्या असलेल्या मोटारसाईकली पोलिस निरिक्षक दशरत चौधरी यांच्या मार्गदर्शनिखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली पवार यांच्या पथकाने  नो पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या ११ वाहनांवर कारवाई करून २०० रूपये प्रमाणे २हजार ४०० रुपये दंड वसुल करुन,गाडीचे कागदपञे तपासुन गाडी मालकांना देण्यात आली.

  प्रतिक्रिया :   भोकरदन शहरात दिवसेंदिवस वर्दळ वाढत असुन ,बरेच लोक आपली मोटारसाईकल रोडलगतच उभी करत असल्याने जड वाहनांना आडथळा निर्मान होत आहे.म्हणुन आम्ही ही मोहीम चालु केली असुन,पुढे हि मोहिम आजुन तिव्र करण्यात येईल,तरी नागरीकांनी सहकार्य करून आपली गाडी ज्या ठिकाणी पार्कींग असेल अशा ठिकाणीच उभी करावी.

   दशरत चौधरी : पोलिस निरिक्षक भोकरदन

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें