*सोनपेठ येथे तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्त्व करंडक स्पर्धा संपन्न*
*सर्व जील्हा स्तरीय निवड झालेल्या विध्यार्थी यांना सर्व स्तरातुन शुभेच्छा*
सोनपेठ / प्रतिनिधी
सोनपेठ येथील कै.र.व.क महाविद्यालयात दि.८जाने.२०१८ रोजी तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्त्व करंडक स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती सोनपेठच्या वतिने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून प.स. सोनपेठ चे विस्तार अधिकारी आर.बी.पंडित, अविनाश माळी, प्राचार्या शेख शकिला, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, श्रीमती वनमाला कोरडे, कायंदे साहेब, गणेश डबुला,भगवान राठोड, संतोष मुंडे, अमोल गांगर्डे शेख इरफान हे होते. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.कनिष्ठ व वरिष्ठ गटासाठी ठराविक विषयावर स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या ह्या वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय,राजीव गांधी महाविद्यालय व वरपूडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.पैकी कनिष्ठ गटामधून सर्वप्रथम श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूपाली मोहिते, वरपूडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी गंगाधर शिंगाडे द्वित्तीय व तृतीय क्रमांक नुरजहाॅं शेख व प्रतिक्षा घोडके या दोघींना विभागून देण्यात आला.
वरिष्ठ महाविद्यालय गटातून सर्वप्रथम प्रशांत सुधाकर शिंगाडे (राजीव गांधी महाविद्यालय .), द्वित्तीय महेश प्रकाशराव भोसले व तृतीय क्रमांक निता वैजनाथ भोसले यांनी मिळवला.विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते लगेच करण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.सखाराम कदम, प्रा.गोविंद लहाणे, श्रीमती वनमाला कोरडे व अविनाश माळी यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डाॅ.बापूराव आंधळे यांनी तर आभार डाॅ.वनिता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता सोनटक्के,चंद्रपाल पटके, संतुक कुलकर्णी, भागवत हाके, बाबूराव फड, एस.डी.परळकर यांनी प्रयत्न केले. राष्ट्रगिताच्या समूहगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम,शिवाजी मव्हाळे,बर्दापुरकर महाराज सर्व सदस्य सर्व प्राचार्य सर्व प्राध्यापक व प्राध्यापीका आदिंनी केले तसेच सर्व जी.प.सदस्य,प.स.सभापती,उपसभापती,सदस्य यांनीही शुभकामना व्यक्त केल्या आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें