*मकरसंक्रांतीनिमित्त होली फेथ इंग्लिश स्कूलमध्ये हळद कुंकू आनंद मेळावा संपन्न*
(अजय बाेराडे)
होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी स्कूलमध्ये हळद- कुंकू ,आनंद नगरी, पालक मेळावा, तिळगुळ, पतंगोत्सव ,भाजीपाला बाजार इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी महिलांसाठी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासोबत वेगवेगळे खेळही आयोजित करण्यात आले होते .उखाणे स्पर्धा, प्रश्नमंजुषा, संगीतखुर्ची आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शाळेच्या मुलांनी अानंद नगरी मध्ये वेगवेगळे चविष्ठ , रुचकर पदार्थांची दुकाने मांडली होती. काही विद्यार्थ्यांनी भाजीवाल्यांची वेशभूषा करून भाजीपाला विकला. प्रसंगी इंग्रजी बोलणाऱ्या भाजीपाला वाल्यांची पालकांनी भरभरून प्रशंसा केली. महिलांच्या उखाणे स्पर्धेत सरिता जैन यांनी प्रथम, रत्ना गुळवे यांनी द्वितीय ,तर रेखा भोपळे आणि जयश्री जगनाडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सरिता जैन यांचा प्रथम, संजना साकला यांचा द्वितीय , तर स्वाती गुळवे यांचा तृतीय क्रमांक आला. संगीत खुर्ची मध्ये कविता सुसुन्द्रे यांचा पहिला, पूजा जगनाडे यांचा द्वितीय तर आशाबाई देशमुख यांचा तृतीय क्रमांक आला. कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक वैशालीताई गुळवे,डॉ. कांचन कुळकर्णी, रूपाली सोनवणे ,प्रीती सोनवणे ,डॉ. नरेश पिंगाळकर, ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील हराळ आदि प्रमुख पाहूण्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीशाळेचे अध्यक्ष संतोष सोनवणे सर मुख्याध्यापक समाधान सोनवणे सर ,शिक्षक प्रशांत देवगय्या, संतोष राकडे , रवी पाकळ ,सेमसन लिमा, अनिल के एम ,मनोज पी पी ,जॉन्सन आयझॅक ,शिवकुमार वाघ, अजय चव्हाण, ढोरमारे सर, शिक्षिका मोरे अश्विनी, भोपळे अल्का ,वर्षा बिलंगे, जगनाडे जयश्री ,गावंडे मनिषा, अॅन्सी जॉन्सन , गोंगे आशा, ज्योती भागवत, सरस्वती सपकाळ ,अमला के जॉर्ज , वनिता दळवी आदींनी प्रयत्न केले.
शुक्रवार, 19 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें