औरंगाबाद उस्मानपुर्यात दगडफेक, टीव्ही सेंटर चौकात मोठ्या घोळक्याकडून घोषणाबाजी
ईमरान खानऔरंगाबाद:-पुणे जिल्ह्यातील कोरगाव भीमा ते पेरणे फाटादरम्यान आज (सोमवार) सकाळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद आता औरंगाबादेतही उघमटले आहेत. उस्मानपुरा भागात दुपारी दगडफेकीची घटना घडली. यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात जमाव रस्त्यावर उतरला आहे. जमावाकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
कांचनवाडीत रस्तारोको...
पैठन रोडवर कांचनवाडीत रास्ता करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दगडफेकीत छायाचित्रकार जखमी झाल्याचे समजते. पैठण तालुक्यातील बिडकिन गेवराई परिसरात तणाव निर्माण झाला असून एसटी बसवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.
शहरातील जय-भवानी नगर, पुंडलिक नगर, गजानन मंदिर चौकात पोलिसांचे राउंड वाढवण्यात आले आहे. दरम्यान, गजानन महारज मंदिर चौकात तणाव परिस्थिती आहे. नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.
सूत्रांनूसार, चार-पाचशे लोक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उस्मानपुरा, क्रांती चौक परिसरात दुकाने बंद केली आहेत. कांती चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आले. मात्र, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अफवा पसरवल्या जात आहेत.
नामफलकावरून उद्भवला वाद...
कोरेभाव भीमा येथून जवळच असलेल्या वढू बुद्रुक येथे 29 डिसेंबरला दोन गटात नामफलकावरून वाद उद्भवला होता. यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.
परंतु, आज सकाळी अज्ञात समाज कंटकांनी गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत.
भीमा कोरेगाव येथे 40 गाड्या फोडल्या..
यात 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तासभर तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात आहे.
काय आहे भीमा-कोरेगावची पार्श्वभूमी?
आज सकाळी झालेल्या दगडफेकीमागे भीमा कोरेगावची पार्श्वभूमी असण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे. भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे शौर्य दिन साजरा केला जात आहे. यासाठी अनेक मान्यवर तेथे उपस्थित आहेत. भीमा कोरेगावात सध्या हजारो लोक जमले आहेत. 1 जानेवारी 1818 ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला आज 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तेव्हापासून कोरेगांव भीमा येथे शौर्यशाली महार सैनिकाना अभिवादन करण्या करीता 1 जानेवारीला विजय दिन साजरा करण्यात येतो.
अफवांवर विश्वास ठेऊ नका..
कोरेभाव भीमासह परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, पोलिस आणि राज्य राखीव दलाने स्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले आहे. कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
-टीव्ही सेंटर येथील व्हर्टेक्स स्पिकिंग क्लासची काच फाडली. तसेच मलकापूर -औरंगाबाद बस फोडली.
- हर्सूल गावात सुद्धा तणाव निर्माण .
-पीआय कॉर्नर - भारत बाजार दुकाने बंद
- उस्मानपुरा, क्रांती चौक येथे जमावाने दुकाने बंद केले.
- जयभवानी नगर, गारखेडा परिसर, शिवाजी नगर,
- पुंडलिक नगर मध्ये जमावाच्या घोषणा
-कांचनवाडी येथे रास्ता रोको
वाहतूक व्यवस्था कोलमडली
-पैठण जाणारी कांचनवाडी येथे बस फोडली,
देवळाई तांडा, पुण्यावरून येताना एक बस, सिल्लोड येथील भराडी येथे,
-एसटी प्रशासनाने तात्काळ रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
पोलीस प्रशासन
प्रथम क्रांती चौक येथे ४०-५० लोकांच्या जमावांनी घोषणा देत, दुकाने बंद केले. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल होत, जवामाला पांगविले. यानंतर हळू हळू प्रकरणाची झुळूक शहरभर पसरली. पोलीस कंट्रोलने तात्काळ शहरातील सर्व पोलिस ठाण्याला घटनेची माहिती देत, परिस्थिती नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. सर्व पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तात्काळ पोलिसांच्या हद्दीत फौजफाटा तैनात केला. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक मुंढे यांनी टीव्ही सेंटर येथे जमलेल्या जमावाला, कशांत करत, जमावाच्या भावना गृहखात्या पर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें