- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

सेलू तालुका योगासन स्पर्धा थाटात संपन्न.
सेलू. ( समशेर खान ) येथे तालुका स्तरीय योगासन स्पर्धा योग सोसायटी ऑफ महाराष्ट्र आणि पतंजली योग समिती सेलू यांच्या दि. 21 जाने. रोजी नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात योगासन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
समारंभात अध्यक्ष पदी शारदा विद्यालयाचे चिटणीस चंद्रप्रकाश सांगताणी,उद्घाटक  नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस डी .के. देशपांडे, जेष्ठ  पत्रकार डी.व्ही .मुळे  महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे व्यवस्थापक सत्येंद्र  चौधरी,दत्तात्रय माकोडे,चंद्रशेखर नावाडे, जगन्नाथ गजमल, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष पाटील, प्रास्ताविक नागेश देशंपांडे, यांनी केले.
स्पर्धा  (मुला - मुली) च्या गटात आयोजित करण्यात आल्या.  स्पर्धेतील विजेत्या  योगपटूना  पतंजली योग समिती वतीने चषक देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत विजेते योगपटू जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा परभणी येथे  सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे पंच म्हणून डी.डी. सोन्नेकर,  माधव देशपांडे   सुनील पिंपळे, रावसाहेब पदमपल्ले,यांनी काम केले.  स्पर्धेतील विजेते योगपटू अपूर्व कुलकर्णी, अभिजित आळणे , पूर्वा माणकेश्वर प्राची माणकेश्वर, शेख नविद , संस्कृती डहाळे , शिल्पा पिंपळे, स्वाती देशपांडे ,काळे लक्ष्मण महाजन सोमनाथ, खत्री रोहित . टाले अजिंक्य, जाधव जयश्री, जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें