News - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 दिसंबर 2017

News

कपाशीवर बोंडअळीची ‘संक्रांत’ उत्पादन आले निम्यावर
शेतकरी पुन्हा अर्थीक खाईत

अनवर पठाण.
प्रतिनिधी,  वालूर                           
-----------------------------------                                         दरवर्षी पर्जन्यमानाची अवकृपा, नैसर्गिक आपत्ती, सदोष बियाणे अशा या ना त्या कारणाने शेती व्यवसाय आणि शेतकरी संक्रमण काळातून वाटचाल करत आहे. यंदाही उशिरा पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांनी हंड्याने पाणी घालून कपाशीची रोपे जगवली. मात्र पिक पदरात आले तर त्यावर बोंडअळीची ‘संक्रांत’ आल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याची व्यथा सेलू तालुक्यातील शेतकरी बोलून दाखवत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. सुरुवातीला पाऊस नसल्याने अगदी मोठ्या मेहनतीने रोपे जगवून मोठी केली. किटकनाशकांच्या महागड्या फवारण्यादेखील केल्या. या झाडांना कैरी लागुन त्यातुन कापूसही बाहेर पडला आहे. मात्र बोंडअळीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कपाशीच्या क्षेत्रावर संक्रातच आली आहे. 
दरवर्षी एक एकर क्षेत्रात १५ ते १८ क्विंटल निघणारा कापूस अवघा ४ ते ७ क्विंटलवर येऊन ठेपला आहे. निघालेल्या कापसावरही रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांबडा रंग चढल्यामुळे बाजारात व्यापारी ठरविल, त्या भावात विकावा लागत आहे. मात्र अशा दारुण परिस्थितीतही तालुक्याचा कृषी विभाग झोपलं आहे. कृषी विभागाच्या या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे पंतप्रधान कृषी पिक विमा योजनेची रक्कम भरुनही पदरात काही पडेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहीली आहे.या वर्षी कपाशीच्या उत्पनात मोठी घट होणार आसल्याने पुन्हा शेतकरी अर्थीक विंवचनेतच राहण्याची पाळी आली आहे.या मुळे परिसरातील  सर्वच शेतकऱ्यांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली आली आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाचे कोणीही अधिकारी पाहणी करण्यास फिरकले नाही. त्यामुळे नुकसानीची ही गंभीर बाब विमा कंपनीच्या कानावर गेली नाही तर नुकसानभरपाई मिळणेही कठीण आहे.शेतातील उभ्या  पीकात बोंडअळीने संपूर्ण तालुक्यातीलच क्षेत्र बाधित केले आहे.कपाशीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन तालुका कृषी अधिकारी किंवा मंडलधिकारी यांनी त्वरीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधून  संबंधित क्षेत्राचे पंचनामे त्वरीत करावे अशी मांगणी शेतकऱ्यानेकडून होत आहे.

तेजन्यूज हेडलाइन्स. वेब वाहिनि ,प्रतिनिधी,
वालूर ता.सेलू.जि.परभणी.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें