* सेलू येथे अभिनव काव्य संध्या शब्दसह्याद्रीचा उपक्रम*
समशेर खान.
सेलू,प्रतिनिधी.
सेलू : येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कवींनी कवी आणि कवितेसाठी चालवलेला ,सेलू नगरीच्या सांस्कृतिकतेत मोलाची भर घालणारा महिनेवारी उपक्रम ( शनिवार ता. ९ रोजी ) शरद ठाकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला . या अभिनव काव्यसंध्येने श्रोत्यांची मने जिंकली. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयिञी जयश्री सोन्नेकर या होत्या.
या काव्य संध्येत दिगंबर रोकडे यांनी ,
ज्यांच्या ठायी वसते पृथ्वी अग्नी वायू आप
माय मही देव देव देव माझा बाप ही कविता सादर करून वातावरण भारावून टाकले. अश्विनी विटेकर यांनी,
अधांतरी आहे । नाव माझी देवा ।
पैलतीर दावा । पांडूरंगा ।। हा अभंग सादर केला. तर चिमुकली कवयिञी सायली हेलसकर हिने आईच्या प्रेमाची महती सांगणारी कविता सादर केली ती आपल्या कवितेत म्हणते,
तिच्या बाळाचं आवरेपर्यंत कावळ्यासाठी दार उघडत नाही , ती असते चिऊताई संभाजी रोडगे यांनी आपल्या कवितेतून सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नावर भाष्य करतांना म्हटले ,
मला वाटतं आपण आता टोळ्या कराव्यात
पुस्तकं फेकून बंदुकीत गोळ्या भराव्यात
तर संजय विटेकर यांनी
कोणास कधी छळले नाही
जीवन बहुदा कळले नाही
दुःख भरजरी होते माझे
भोग तरीही टळले नाही
या आपल्या गजलेन श्रोत्यांना गंभीर केले.
डॉ. अशोक पाठक यांनी , लोकं अशाच धाग्यांनी
बांधले जातात वर्षानुवर्षे
बाजारात जाऊन स्वप्न गहाण ठेवून
वरचेवर दुःख विकत घेतात लोकं
ही कविता सादर केली.
योगेश ढवारे यांनी 'घालमेल', कैलास लव्हेकर यांनी 'आता फासावर चढायच नाय ', सुमिता सबनिस यांनी 'पांढर सोन' ही शेतकय्रांचे वास्तव जीवन उलगडणारी कविता सादर केली. तर सुरेश हिवाळे यांनी 'मी एक कवी', शरद ठाकर यांनी 'माहेर', गौतम सुर्यवंशी यांनी 'बेशरमाची झाडे', प्रा. के.डी. वाघमारे यांनी 'निखार' ही कविता सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष कवयिञी जयश्री सोन्नेकर यांनी
विष की अमृताच्या खेळात
विष नव्हतेच मुळी
किल्मीष नव्हतं कुठल्या गोष्टीचं
कधीच विचारणा झाली नाही
मैञीत जातकुळीची...! या आपल्या कवितेतून बालपणीची निरागसता विशद केली. कवी संमेलनाचे सुञसंचालन सुमिता सबनिस यांनी केले. कवितेच्या रेशमी गारव्यात श्रोते गोड गुलाबी थंडीला विसरून गेले.
रविवार, 10 दिसंबर 2017
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें