*श्रीराम प्रतिष्ठान आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धा संपन्न*
*"अवनी एक संघर्ष.." या मराठी चित्रपटाचा शुभारंभ*
समशेर खान.
प्रतिनिधी,सेलू.
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित वैयक्तिक नृत्य स्पर्धा व सँनरो फिल्म प्राँडक्शन निर्मित *"अवनी एक संघर्ष..."*या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ (ता.9) वार शनिवार रोजी साई नाट्य गृह येथे येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी "अवनी एक संघर्ष" या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कारखानीस, सह दिग्दर्शक कृष्णा शरणांवत, संस्थेच्या सचिव डाॅ. सौ.सविता रोडगे, आदित्य भैय्या रोडगे, डाँ.हर्षा माकोडे, अँड.रुपाली आम्ले, भारत डख, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, परिक्षक डाँ.मधुबाला बोराडे, अशोक जोगदंड, राजश्री लोया शाळेच्या मुख्याध्यापिका शालीनी शेळके, प्रिती सँम्युअल व रोबिना सँम्युअल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला अवगत असते आणि त्या कलेला वाव मिळण्याच व्यासपीठ म्हणजे शाळा. त्यामुळे शाळेतील विविध स्पर्धेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्या कलेविषयी जाण होऊन त्यास वाव मिळेल. आणि कोणतीही गोष्ट करायची तर ती मन लावुन करायला पाहिजे म्हणजे अविरत स्मरणात राहते. विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे डाॅ. संजय रोडगे म्हणाले.
सेलू ही कलाकारांची भुमी आहे.कलाकार हा कलेच्या साधनेतुन घडलेला असतो. भुत्या भुत्या भटकु दे.... या साठी सेलूतील कलाकारांना संधी दिली. कलेला योग्य न्याय दिला पाहिजे, योग्य वाव मिळण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाची गरज असते. असे यावेळी नितीन कारखानीस म्हणाले.
या स्पर्धेत ज्ञानतीर्थ विद्यालयातुन बालवाडी विभागात प्रथम समिक्षा पांचाळ, द्वितीय अंकिता चव्हाण, तृतीय ज्ञानेश्वरी लाटे, इयत्ता पहिली व दुसरी गटातुन प्रथम प्रतिक्षा केंद्रे, द्वितीय सार्थक शेळके, इयत्ता तिसरी व चौथी गटातुन प्रथम नाविद शेख, द्वितीय शिवानी केंद्रे, पाचवी व सहावी गटातुन अभिजीत धुमाळ, कोल्हे सातवी ते नववी गटातुन पहिल्या क्रमांकावर साक्षी काकडे व समीक्षा डिडाळे द्वितीय क्रमाकांवर दिशा निकम व गायत्री ठाकुर ह्या विजयी ठरल्या.
प्रिन्स अकॅडमी सी.बी.एस.ई. स्कुल मधुन इयत्ता पहिली मधुन पार्थ कासट प्रथम तर केतकी सोडगीर द्वितीय , इयत्ता दुसरी मधुन ओंकार खुडे प्रथम तर अनुष्का साबळे, क्षीतीजा खन्जीना द्वितीय , इयत्ता तिसरी मधुन खुषी मानधनी व आरुष प्रथमेश तर सेजल मोरे द्वितीय, इयत्ता चौथी मधुन प्रथम प्रिती मुसळे तर सम्यक विश्वांभर द्वितीय , इयत्ता पाचवी मधुन तनवी सोमानी प्रथम तर शेफालीका सँम्युअल द्वितीय, इयत्ता सहावी मधुन जान्हवी पौळ प्रथम तर मिताली काला द्वितीय , इयत्ता सातवी मधुन शिवम खरावणेतर राधिका बिर्ला द्वितीय इयत्ता नववी मध्ये आरती कुकरेजा प्रथम तर श्वेता सिंग हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धत एकुन 126 स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये प्रिन्स अकडमी सी.बी.एस.ई. स्कुल, प्रिन्स इंग्लिश स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, उत्कर्ष विद्यालय इ शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा निकम व भगत श्रुती यांनी तर आभार ठोके सर यांनी केले. यशस्विते साठी प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
--
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें