*विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचे व्यासपीठ म्हणजे सुरभि महोत्सव – स्वरूप कंकाळ*
*ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.*
*चिमुकल्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.*
सेलू , :- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम (ता.१९) डिसेंबर मंगळवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला
‘ रंग मराठी मातीचा ’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सेलू येथील तहसीलदार मा. स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांची उपस्थिती होती.तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या मा.इंद्रायणी रोडगे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मा.छगण दादा शेरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष मा.बालाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे, रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ.रामराव रोडगे,नगरसेवक मा.विठ्ठल काळबांडे, नगरसेवक मा.संभाजी पवार रवळगाव येथील सरपंच मा.राधिका दीपक रोडगे,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मा.मधुकर जाधव डॉ.किशोर जवळेकर, मा.बाबा राखे,मा.विलास पौळ, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,शाळेच्या मुख्याध्यापिका मा.शालिनी शेळके मा.निशा तोष्णीवाल मा.दगडूबा माने आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. आपल्या उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मा. स्वरूप कंकाळ म्हणाले की, “सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उलेखनीय उपक्रम असून डॉ.संजय रोडगे यांनी शैक्षणीक वातावरणाला चांगले वळण देण्याचे काम केले आहे.तसेच श्रीराम प्रतिष्ठान मार्फत डॉ.संजय रोडगे हे सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विध्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्याच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहेत.
छगण दादा शेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सेलू शहर हे मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी असून श्रीराम प्रतिष्ठाने आपल्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामधून सेलू शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्कारची जडणघडण कश्या पद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते.या प्रसंगी बाबा राखे, मधुकर जाधव,आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बालकलाकारणी आपल्या कला प्रकारातून महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिची ओळख करून दिली. यामध्ये गोंधळ, धनगर गीत,शेतकरी गीत, कोळी गीत,आदिवाशी नृत्य,वारकरी गीत, लावणी ,आदि महाराष्ट्रातील लोकधारावर आधरित विविध सामुहिक नृत्याचे सादरीकरण केले. तसेच चला हवा येऊ दया या मराठी विनोदी नाटिका सादर केली. आणि शेतकरी जीवनावर सत्य कथेवर आधारित “ शेतकरी आत्महत्या “ या नाटिकेचे सादरीकरण केले. यांना मार्गदर्शन संजय ठाकर, रवी रोडगे, दगडोबा माने यांचे लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिगंबर टाके, ऋतुजा मोगल, प्रेरणा लाटे,श्रुती भगत, शुभांगी गजमल, प्रज्ञा मोरे, तर आभार दामोदर ठोके यांनी मानले. यशस्वितेसाठी ज्ञानतीर्थ विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें