- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 दिसंबर 2017

*बोगस कागदपत्राच्या आधारे प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न; दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल*

शेख.मूसा(प्रतिनिधी) जालना.

जालना, (प्रतिनिधी)- जालना शहरातील मोंढा रोडवरील कल्पतरू हाऊसिंग सोसायटीमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे प्लॉट बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोनजणांविरूध्द सदर बाजार पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील संभाजीनगर विभागातील नगर भूमापन क्रमांक 11482/122 मध्ये कल्पतरू हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये एकही प्लॉट शिल्लक नसतांना सोसायटीच्या पंधरा मीटर रस्त्यावर बोगस प्लॉट क्रमांक दाखवून त्याचे बोगस व बनावट कागदपत्रे बाबुराव पुंडलीकराव मात्रे व रवि हरिभाऊ राऊत यांनी संगनमत करून बनवले. रस्त्याचे काम सुरू असतांना त्या ठिकाणी येऊन या दोघांनी मजूरांना हाकलून देऊन सदर जागा बनावट कागदपत्राच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोहेकॉ. बापूसाहेब निवृत्तीराव भारकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीसांना बाबुराव मात्रे व रवि राऊत या दोघाविरूध्द भादंवि 420, 465, 467, 471, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें