*अवैध दारूवर चारठाणा पोलीसांची धडक कार्यवाही*
एकनाथ वाळके.
प्रतिनिधी,जिंतूर (ग्रामिण)
बिट जमादार जधवामुळे अवेैध धंदेवाल्याना लागला लगाम
जिंतुर तालुक्यातील जोगवाडा परिसर हा चारठाणा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येतो.हा परिसर म्हणजे अवेद्य धदेवाल्यांचेएक प्रकारचे माहेरच होते परंतु जेव्हा पासून ए.पी.आई.पांडे यांनी चारठाणा पोलीस स्टेशन चे सूत्र हातात घेतली तेंव्हा पासून मात्र या परिसरातील अवेद्य धंदेवाल्यांच्या पायाखालची रेती सरकू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
आणी त्यातच मागील काही महिन्यापासुन नव्याने बिट घेतलेल्या रवी जधवानी तर जोगवाडा परिसरातील अवेद्य धंदे वाल्यांच्या मुसक्याच आवळल्या आहेत.
विशेष म्हणजे बिट जमादार जाधव यांच्या कडे जोगवाडा बिट परिसर हाती दिला तेंव्हा पासून या परिसरातून अवेद्य हद्दपार केले आहेत.त्यामुळे या परिसरातील अवेद्य धंदेवाल्यावर चांगलाच लगाम लागला आहे.विशेष म्हणजे बिट जमादार जेव्हा पासून रुजू झाले आहेत तेव्हांपासून या परिसरावर आपली कार्डि नजर ठेऊन आपली कर्तव्य पार पाडत असल्याची चर्चा जोगवाडा व जोगवाडा परसरातिल नागरिंकांतुन ऐकवयास मिळत आहे काल दिनांक दोन डिसेंबर शनिवार रोजी संध्याकाळी पाच च्या सुमारास येणारी देशी दारू मोटारसायकल सह जप्त केली.
या कार्यवाहीत चारठाणा पोलीस स्टेशन चे कर्मचारी मंचक जाधव, गणेश शेटे आणी बिट जमादार रवी जाधव होते.
यांच्या ह्या मागील काही महिन्यापासुन सुरू धडक कार्यवाही मुळे चारठाणा पोलीस स्टेशन हद्दीच्या व जोगवाडा परिसरातील नागरिकातुन विशेष करून महिला वर्गातुन संतोष व्यक्त होत आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें