- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 दिसंबर 2017

पिपंळगाव पेठ येथिल सरपंचावर कारवाई करण्याची मागणी.
सभागुहाला ग्रामपंचायत नाव देऊन चक्क भाजपा पार्टिचे दिले रंग 
उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकार्यांना देण्यात आले निवेदन
सिल्लोड प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातिल पिपंळगाव पेठ येथिल ग्रामपंचायत सभागृहात हलवून सभागुहालाच ग्रामपंचायतीचे नाव देऊन चक्क भाजपा पार्टिचे रंग दिल्याचा आरोप करुण सरपंचावर कार्यवाही करण्यात यावी नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिलिप जाधव, साहेबराव दिवटे,यांनी उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोनत्याही नियमाचा विचार न करता गोरगरीबासाठी खासदार निधितुन दिलेले सभागुह सरपंचानी चक्क ग्रामपंचायतच बनवुन टाकले आहे.जुनी ग्रामपंचायत इमारत सुस्तिथित असतांना सुध्दा फक्त गावकर्यासमोर शक्तिप्रदर्शन दाखवायचे काम सरपंच करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.तसेच
हि घटना गावाला लज्जास्पद वाटण्यासारखी असून पंधरा दिवसाच्या आत ग्रामपंचायत सभागुहाला शासनाच्या नियमानुसार कलर देण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतीची पुढिल मिटींग आम्ही होऊ देनार नाही आणि सरपंचावर कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषनाला बसु असा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिलिप जाधव, साहेबराव दिवटे यांनी दिला आहे.

कोणत्याही पक्षाने रंग वाटून घेतला नाही........
या प्रकरणी सरपंचाशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता सरपंचाचे दिर देवीदास सांगळे जे गेवराई येथे जिल्हा परिषद येथे शिक्षक आहे त्यांनी प्रतिक्रिया देऊन म्हंटले की आजपर्यन्त कोणत्याही पक्षाने आपला रंग वाटून घेतला नाही तर ग्रामपंचायतिला भाजपाचा रंग देण्याचा प्रश्नाच येत नाही आनी राहिली सभागृहात ग्रामपंचाय स्थलांतर करण्याची गोष्ट तर ग्रामपंचायत इमारत खुप जुनी असल्याने व ऑपरेटर तसेच सरपंच,सदस्य यांना बसन्यास जागा नसल्याने ग्रामपंचयत इमारत सभागृहात स्थलांतर करण्यात आली आहे.नविन ग्रामपंचयत बांधकाम विचारधीन असून नवीन इमारत झाल्यानंतर सभागृह रिकामे करण्यात येईल.

मला कल्पना नाही..........
पिपंळगाव पेठ येथिल सरपंचांनी काय प्रकार केला याची मला कल्पना नाही.खरा प्रकार काय आहे ते विचारपुस करूँ कळवतो असे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी या प्रकरणी हात झटकले.

मी पुण्याला आहे..........
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाळे यांना यसंबंधी विचारपुस केली असता ग्रामपंचयतिला पक्षाचा रंग देता येतो की नाही याबाबत मला कल्पना नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले.तसेच मी सध्या पुण्याला प्रशिक्षणासाठी आल्याने याबाबत काही सांगता येणार नाही अशी प्रतिक्रया दिली.



सिल्लोड तालुक्यातिल पिपंळगाव पेठ येथिल ग्रामपंचायत सभागृहात हलवून सभागुहालाच ग्रामपंचायतीचे नाव देऊन चक्क भाजपा पार्टिचे रंग दिल्याचा आरोप करुण सरपंचावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य दिलिप जाधव, साहेबराव दिवटे,यांनी उपविभागिय अधिकारी यांना दिले.तर दुसऱ्या छायाचित्रात सभागृह येथे ग्रामपंचायत हलवून पक्षाची रंगरंगोटी करण्यात आली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें