- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

जिंतूर तालुका स्वाभीमानी पत्रकार संघ स्थापन करण्याची घोषणा 

जिंतूर : प्रतिनीधी
जिंतूर तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध ज्वलंत प्रश्नाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी  जिंतूर तालुक्यात "स्वाभिमानी पत्रकार संघ" लवकर स्थापन होणार असून या पत्रकार संघासाठी जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक राजाभाऊ नगरकर  यांच्या अध्येक्षतेखाली रविवार 10 डिसेंबर रोजी पत्रकारांची बैठक संपन्न झाली.

पत्रकार हा नेहमी समाजा मधील चालू घडामोडी सूक्ष्म नजर ठेवून सत्यता बाहेर अन्यासाठी जीवाचे रान करतो मात्र त्याच्या या महान कार्याची कोणीच दखल घेत नाही अशा उपेक्षित पत्रकारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांना भेडसावत असलेले विविध ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याचा पाठीमागे पाठबळ उभे व्हावे यासाठी "जिंतूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघ" पुढाकार घेणार असून पत्रकार संघ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे  या साठी बैठक पार पडली या बैठकीचा अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर होते यावेळी गुनिरत्न वाकोडे,शेहजाद पठाण,एकनाथ वाळके,शेख वाजीद,शेख अलिम,राजेश देशमुख,उत्तम शेळके,मौलाना सिराज,रियाज चाऊस,रफीक तांबोळी,शेख मुसा,अशोक भालेराव,सचिन रायपत्रीवर,राजाभाऊ काळे,गौतम मस्के,राजेभाऊ काळे, रामप्रसाद कंठाळे हे उपस्थित होते
यावेळी तालुक्यातील सद्या कार्यरत असलेल्या पत्रकारांनी जेष्ठांसी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें