- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 31 दिसंबर 2017

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुस्लीम समाजासोबत अन्याय केला – अबरार बेग

समशेर खान
प्रतिनिधी,सेलु
सेलू काँग्रेस शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून मुस्लिम कार्यकर्त्यास डावलून काँग्रेस कमिटी शहराध्यक्षपदी श्री विनोद तरटे यांची नियुक्ती करण्यात आली. विशेषत: या पदासाठी मुस्लिम कार्यकर्ताची मागणी होती. त्यासाठी कारण ही तसेच होते. गेल्या वर्षी सेलू नगर परिषदेची निवडणुक पार पडली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये फक्त एक मुस्लिम नगरसेवक श्री रहिमखान खैरुल्ला निवडून आले. परंतू जास्त प्रमाणात मुस्लीम मते ही काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडली. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार पवन आडळकर हे केवळ 1400 मतांनी पराभूत झाले. मुस्लिम बहुल प्रभागात पवन आडळकर हेच आघाडीवर होते. त्यांचे वडील जेष्ठ काँग्रेस नेते हेमंतराव आडळकर यांचा इतर वार्डातून निसटता विजय झाला. परंतु त्यात सुद्धा मुस्लिम मतांचा सिंहाचा वाटा आहे.
मुस्लिम समाजातील उमेदवार काँग्रेसकडून पराभूत झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने शहराध्यक्षपदी श्री अबरार बेग किंवा इतर मुस्लिम कार्यकर्त्यास ही संधी द्यावी असे नगरसेवक रहिमखान पठाण व पराभूत उमेदवार शेख अमजद बागवान (प्रभाग क्र. 6), शेख शफीक शेख फारूक (प्रभाग क्र. 5), आसेफखान पठाण (प्रभाग क्र. 2), गौस खतीब (प्रभाग क्र. 8) तसेच युवा शहराध्यक्ष साजिद लाला या कार्यक्रत्यांनी जिल्हाध्यक्ष श्री सुरेशरावजी वरपुडकर यांच्याकडे आग्राहाची मागणी केली होती. तसेच त्यांनी त्याबाबत त्यावर गांभीर्याने विचार करून मुस्लिम समाजात शहराध्यक्ष पद दिले जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु ऐनवेळी श्री विनोद तरटे यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेसमध्ये मुस्लिम कार्यकर्ते नाराज झालेले आहेत.
काँग्रेस केवळ मतांसाठी मुस्लिम समाजास लालूच दाखवून मते घेण्याचे काम करते व नंतर त्यांना डावलून इतरांना पदे देण्याचे कारस्थान वरीष्ठांकडून केल्या जाते. शहरात एकुण मतदानापैकी जवळपास 12 हजार मते मुस्लिम समाजाची असून आतापर्यंत काँग्रेस स्थापनेपासून सेलू शहरात मुस्लिम समाजाला शहराध्यक्षपद दिले गेले नाही. त्या समाजातील कार्यकर्त्यांना निवडून आणण्यात सुद्धा राजकारण केल्या जाते व काँग्रेस पक्षाचे पदे देण्याचे मान्य केलेले असतानासुद्धा ऐनवेळी इतरांना पद दिले जाते. त्यामुळे सेलू शहरात नाराजीचा सुर निघत आहे. काँग्रेस पक्षातील एकमेव मुस्लिम नगरसेवक रहीमखान पठाण हे प्रभावशाली व्यक्तीमत्व असून त्यांच्या संस्था, शाळा आदि पदांवर ते असतांनासुद्धा  त्यांची मागणी होती की शहराध्यक्ष पदी अबरार बेग जे की, शिक्षीत असून पत्रकारसुद्धा आहेत. तसेच ते काँग्रेस अल्पसंख्यांक शहराध्यक्ष असून त्यांनी शहर कार्यालयाचे व शाखेचे उद्घाटनाचे कार्य करून काँग्रेस कार्यकर्त्यांची जोडणी केलेली असतांना तसेच त्यांची इतर समाजाशी जवळीक असतांना तसेच काँग्रेस पक्षाशी व वरीष्ठांशी एकनिष्ठ व संलग्न असतांना त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती व्हावी यासाठी त्यांनी परभणीतील वरीष्ठांना याबद्दल जाऊन भेटून सुद्धा त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवून इतरांना पद दिले गेले. शेवटी निर्णयाचा फेरविचार वरिष्ठांनी करावा अशी सेलू शहरात मागणी आहे. परंतू संतप्त अबरार बेग यांनी या बाबत राजकारण झाल्याने मुस्लिम समाजातील उमेदवारास डावलले हे काँग्रेससाठी हितकारक नाही अशी तिखट प्रतिक्रीया त्यांनी दिली.
Tezznews24 web news portel
Editor=Anwar pathan.
Mo.no.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें