वस्तुनिष्ठ मोजणी करुन ती जागा डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व क्रिडा संकुलानासाठि राखिव करण्याची मागणी*
प्रतिनिधी.परभणी.दि.15/02/2024.
वालुर ता.सेलु जि.परभणी येथील सर्वे गट नं.479 हि सरकारी गोठानची प्रतिबंधीत मोकळी जागा बोरी वालुर रोडवरील जिल्हा परिषद प्रशालेच्या पश्चीम दिशेच्या बाजुस आहे तेथे काहि खाजगी लोकांनी अवैध रित्या कब्ज़ा करुन तेथे पक्के बांधकाम चालु केले असल्याने शासनाची जमिन हि शासनाच्या वापरात येण्यासाठि राखिव असताना यांना बांधकामाची परवानगी कोनी दिली याची चौकशी करुन जागेची वस्तुनिष्ठ मोजणी करुन संबंधीतांवर कडक कायदेशीर कार्यवाहि करण्यात यावी तसेच तेथील होणारे अतिक्रमण अवैध बांधकाम तात्काळ थांबवण्यात येऊन ती जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व क्रिडा संकुल उभारण्यासाठी राखिव करण्यात यावी हि मागनी आठ दिवसात प्रकरणी योग्य ती दखल घेऊन कडक कायदेशीर कार्यवाहि न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन मैदान परभणी येथे दि.15/02/2024 रोजी पासुन आमरण उपोषणाचा इशारा युवा विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे दि.06/02/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना देण्यात आला होता. परंतु निवेदनावर दखल घेण्यात आली नसल्याचे आज दि .15/02/2024 रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनवर दिलावर पठान तडवी, राजाराम आनंदा सिरसाठ, जुबेर खान मन्सुर खान पठान, सोहेल खान लतिफ खान पठान, समीर खान समशेर खान पठान आदि आंदोलन मैदान परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें