पालम/प्रतिनिधी.दि.22/10/2020.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वत्र माझे कुटुंब माझे जबाबदारी या अभियानाला सुरुवात झाली असून या होत असलेल्या अभियानास शहरातील सर्व नागरिकांनी घरी राहुन पूर्णतः सहकार्य करून प्रतिसाद द्यावा असे आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे पालम तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांनी केले आहे.
पालम शहरातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आशा वर्कर व आरोग्य विभागाच्या पथकाकडून सर्वात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियानाची दुसरी फेरी राबविली जात आहे.या राबविल्या जाणाऱ्या अभियाना अंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांची कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.यामध्ये शरीरातील ऑक्सिजन गण मशिनच्या साह्याने शरीराचे तापमान मोजण्याचे काम शहरातील प्रत्येक वार्डात नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागांतर्गत सुरू आहेत या होत असलेल्या कामास नागरिकांनी स्वतः घरी राहून घरातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करीत आप-आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन राबविण्यात येत असलेल्या अभियाना याप्रसंगी पुरोगामी पत्रकार संघाचे पालम तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांनी सांगितले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें