परभणी, दि.15(प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसेदिवस वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यात दि.15 जुलै मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस दि.17 जुलैपर्यंत मुदतवाढ बहाल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.
नागरी क्षेत्रात दि.10 ते 12 जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. परंतू त्या संचारबंदीस दि.12 जुलै ते 15 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली. ते करते वेळी नागरी क्षेत्रा ऐवजी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यातच संचारबंदीचा निर्णय घेतला होता. गंगाखेड शहरासह तालुक्या संदर्भात स्वतंत्र आदेश बजावून दि.19 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें