सेलु‌ तालुक्यात‌ मटका,गुटका,दारु,वाळु तस्करी हे अवैध धंदे जोमात... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 जून 2020

सेलु‌ तालुक्यात‌ मटका,गुटका,दारु,वाळु तस्करी हे अवैध धंदे जोमात...


दि.13/06/2020
सेलु तालुक्यात मागील काही दिवसापासून मटका,गुटखा,दारु,वाळू तस्करी या अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला आहे. कोरोनाच्या काळात अम्लीपदार्थ बंदि असतानाहि गुटका हा खुलेआम विक्री होत आहे.
सेलु पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये मटका,गुटखा,दारु, अवैध वाळू तस्करी,या सारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळली असून या धंद्यांना ऊत आला आहे.
मटका,गुटखा व दारुचे व्यसन जडल्याने शहरासह ग्रामीण भागातील युवा पिढी मटका,गुटखा व दारुची कमालीची व्यसनाधिन झाल्याने युवा पिढीची ही वाढती व्यसनाधिनता एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे.राजरोसपणे चालणा-या अवैध धंद्यामुळे युवा पिढी अक्षरशः बरबाद होत आहे.
सेलु तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असताना स्थानिक पोलिस माञ याप्रकरणी काहीही कारवाई करत नाही.अवैध धंदेवाले व स्थानिक पोलिस यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले असल्याने पोलिसांचेच या अवैध धंदेवाल्यांना अभय असल्याचे व पोलिसांचा आशीर्वाद असल्यामुळेच तालुक्यातील ही अवैध धंदे खुलेआम सुरु आहे अशी चर्चा होत आहे.त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालनार कोन ?? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें