देशपांडे काकांवर मुस्लिमांनी.अंत्यसंस्कार का केले..?अंजुम इनामदार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 27 मई 2020

देशपांडे काकांवर मुस्लिमांनी.अंत्यसंस्कार का केले..?अंजुम इनामदार.



गेले काही दिवस काही ब्रह्मवृंद मित्र, नातेवाईक, भाजपप्रेमी अशा एकूणच सगळ्या भक्तपरिवाराकडून आयटी सेलने बनवलेल्या काही  पोस्ट मला वारंवार येतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात कसे झोकून काम करत आहेत, किती ती शिस्त, नियोजन वगैरे आणि शिफ्टनुसार कसे काम करत आहेत याची धादांत खोटी आणि अतिशयोक्तीपूर्ण माहिती या पोस्टमध्ये असते. कुणी बरखा दत्तचा तर कोणी एखाद्या गल्लीतील मदतीचा एखादा फोटो, व्हीडीओ टाकून देशभरात संघ परिवाराचे, भाजपचे कसे सेवाकार्य चालू आहे याची सपशेल खोटी माहिती होलसेलमध्ये इकडून तिकडे, तिकडून इकडे पाठवत असतात. प्रत्यक्षात मात्र हे कार्यकर्ते सेवाकार्यात कुठे नसतातच, उलट जीवाच्या भीतीने घरातच लपलेले असतात. हा भित्रा परिवार स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी जसा गायब होता तसाच तो या कोरोना युद्धातही गायब आहे. उद्या कोणी विचारणा केलीच तर दाखवायला दोन फोटो एखादा व्हीडीओ असावा म्हणून दिखावा तेवढा सुरू आहे.  हा सगळा भक्त परिवार कसा घरात लपून बसला आहे, याचा भक्कम पुरावा काल अकोल्यातून समोर आला. देशपांडे नामक एका काकांचे विदर्भातील अकोल्यात कोरोनामुळे निधन झाले.  त्यामुळे देशपांडे यांच्या कुटुंबाची भीतीने गाळण उडाली. देशपांडे काकांच्या मुलाने तर दवाखान्यात जाऊन वडिलांचे साधे अंत्यदर्शनही घेतले नाही. देशपांडेंचा एकही नातेवाईक रुग्णालयात, शवागाराकडे फिरकला नाही. उलट रुग्णालयाच्या प्रशासनाला देशपांडे कुटुंबाकडून अंत्यसंस्कार उरकून टाकण्याची सुचना करण्यात आली.  रा. स्व. संघ आणि भारतीय जनता पक्षाचे अकोल्यात पायलीचे पन्नास पदाधिकारी आहेत. या सेवाभावी सेवाव्रतींपैकीही कोणी देशपांडे काकांकडे ढुंकूनही बघितले नाही. जिवंत असेपर्यंतही कोणी फिरकले नाही आणि मृत्यूनंतरही देशपांडे काकांचा पार्थिव देह जिल्हा रुग्णालयात बेवारस अवस्थेत पडून होता. अखेर काही मुस्लिम तरूण पुढे आले, आणि त्यांनी देशपांडे काकांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. जाणकार हिंदुधर्मीयांकडून या मुस्लिम तरूणांनी दाहसंस्कार कसा करायचा याची माहिती घेतली आणि हिंदू रीतीरिवाजानुसार  चिता रचून, अग्नीडाग देऊन साधी ओळख-पाळखही नसलेल्या काकांचे अंत्यसंस्कार पार पाडले. "जय ...राम" म्हणणारा अकोल्यातील एकही समाजबांधव तिथे उपस्थित नव्हता. ज्या विदर्भात रा. स्व. संघाची स्थापना झाली, त्याच विदर्भात एका प्रखर हिंदूधर्मीय काकांवर मुस्लिमांना अंत्यसंस्कार करावे लागले. अकोल्यात भाजपचे खासदार आहेत. शहरात भाजप आणि संघाचे नेटवर्क आहे.. मात्र देशपांडे काकांना कोरोनाची बाधा झाली आणि कुटुंबाप्रमाणेच सेवाकार्याचा ढोल बडवणाऱ्या संघ-भाजप परिवारानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. चार मुस्लिमांनी एकत्र येऊन देशपांडे काकांवर अंत्यसंस्कार केले म्हणून देशपांडेंचा हिंदू धर्म गळून पडला नाही, किंवा हिंदूधर्मीयावर अग्नीसंस्कार केले म्हणून त्या मुस्लिमांचा धर्म गळून पडला नाही. गळून पडला तो संघ परिवाराचा मुखवटा!  जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अकोल्यात संघाचे चार कार्यकर्तेही पुढे येऊ नयेत एका हिंदुधर्मीयाच्या अंत्यसंस्कारासाठी?
मुंबई पासून दिल्ली पर्यंत सोशल मीडियावर संघाच्या सेवाकार्याच्या भंपक पोस्टस् चा  पाऊस पाडणाऱ्या भक्तमंडळींच्या खोटेपणाचा  किळसवाणा चेहराच यानिमित्ताने समोर आला. देशपांडे काका, तुमच्या मुलाला, नातेवाईकांना आणि सेवाकार्याची नुसतीच जाहिरातबाजी करणाऱ्या 'परिवारा'लाही माफ करा..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें