ईद-ए-मिलाद नबी रोजी दारूचे दुकाने बंद करण्याची,एम,डि,ओ, संघटनेची जिल्हा अधिकारी कडे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 नवंबर 2019

ईद-ए-मिलाद नबी रोजी दारूचे दुकाने बंद करण्याची,एम,डि,ओ, संघटनेची जिल्हा अधिकारी कडे मागणी.

प्रतिनिधी.दि.07/11/2019.
परभणी : येथील मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कडे एका निवेदनाद्वारे असे कळविण्यात आले की  दिनांक 10 / 11 / 2019 रविवार रोजी ईद - ए - मिलाद नबी हा मुस्लिम समाजाची ईद आहे हा दिवस म्हणजे प्रेषित पैगंबर ( मोहम्मद सल्लल्लाहअलैही वसल्लम ) यांचा जन्मदिवस ही ईद (उत्सव) संपूर्ण देशासहीत इतर राष्ट्रातही हर्षोल्हासात साजरी केली जाते यावेळी संपूर्ण जिल्ह्यांतील शहरात विविध कार्यक्रम , स्पर्धा , वकृत्व स्पर्धा , बऱ्याच मस्जिदी समोर अन्नदानाचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . तसेच शहरातील धार्मिक स्थळ बारादरी मस्जिद परीसरात अनेक विवाह सोहळ्याचे ही आयोजन करण्यात येते  विशेष म्हणजे या दिवशी शहरातून भव्य अशी जलोउसाहात मिरवणूक  काढण्यात येत या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी व कुठल्याही समाजाच्या कोणत्याही समाज कंटकाकडून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची खबरदारी म्हणून ईद ए - मिलाद नबी या पवित्र दिवशी जिल्ह्यातील सर्व दारूचे दुकान एका दिवसासाठी बंद ठेवणे ( ड्राय - डे ) अत्यंत आवश्यक आहे .  दि . 10 / 11 / 2019 रोजी ईद - ए मिलाद नबी या पवित्र दिनी संपूर्ण परभणी जिल्ह्यात एक दिवसासाठी दारू दुकाने बंद ठेवण्यासाठी योग्य ते आदेश निर्गमीत करावे तसेच प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावे जेणे करून जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाजाला ईद - ए - मिलाद नबी हा पवित्र सण अतिशय हर्षोल्हासात साजरा करता येईल  या पवित्र दिनात साजरे होणाऱ्या कार्यक्रमास गालबोट लागू नये व जिल्ह्यात कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे महेबुब खान पठाण ,सय्यद रफीक पेडगांवकर ,शेख उस्मान शेख इस्माईल , मुजिब ठाण, अॅड .आसेफ पटेल, अब्दुल मोईज, अँड सुलतान मांडाखळीकर, अब्दुल रहीम ,शेख सुलेमान , आमेर अली खान,शेख यामीन पटेल, शेख शमशोदिन, लक्ष्मण पवार, यदिचे निवेदनावर साक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें