मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व अशी स्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे. राज्यपालांनी प्रथम भाजपाला आणि नंतर शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, दोन्ही पक्षही सत्ता स्थापन करू शकले नसल्यानं राज्यात तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी केवळ शिवसेनेला वेळ वाढवुन देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या सत्ता स्थापनेचा दावा खारिज केला नाही असं शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
राजीव सातव म्हणाले, “सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच दोन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे निर्णय घेतील.” तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजीव सातव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्ष नेमका काय निर्णय घेणार आहेत आणि शिवसेनेला त्यांचा पाठिंबा असणार आहे का असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर सातव यांनी मौन बाळगलं.
दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेची मुदत नुकतीच संपली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा नव्हता. त्यामुळे ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकले नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण यांनाही माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. आमची चर्चा सुरु आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार चर्चा करत आहेत आणि ही चर्चा सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें