गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; बी.ए.एम.एस.डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी: - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 अक्टूबर 2019

गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; बी.ए.एम.एस.डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी:

दि.31/10/2019.
गंगापुर(योगेश मोरे प्रतिनिधी): शहरात पुन्हा एकदा बी.ए.एम.एस.डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी...?गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात यावी;अशी मागणी होत आहे.शहरातील ओमसाई हॉस्पिटलमध्ये 28 वर्षीय महिलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ.अमीत गुंजाळ यांची पत्नी डॉ.सौ.अर्चना गुंजाळ यांच्या ओमसाई हॉस्पिटलमध्ये मन्सूरी कॉलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हिला प्रसुती करिता दाखल करण्यात आले होते.डॉ.अमीत गुंजाळ व डॉ.सौ.अर्चना गुंजाळ यांनी या महिलेची प्रसुती केली,परंतु प्रसुतीनंतर आशमास जास्त रक्तस्त्राव होत असल्याने डॉ.गुंजाळ यांनी महिलेच्या नातेवाईकांना सांगितले आशमा हिचा रक्तदाब वाढला असुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला ल.यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले.परंतु उपचार चालू असतांना आशमा हिचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्तस्त्राव झाल्याचा पंचनामा  पोलिसांनी केल्याचे सांगितले.
आशमा हिच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ. अमीत गुंजाळ व त्यांची पत्नी डॉ.सौ. अर्चना गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता. मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईक मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.

5 टिप्‍पणियां:

  1. अशा बातम्या छापण्या आधी पत्रकार लोकांनी खरंच नीट अभ्यास करण्याची गरज आहे, पुरेशा माहितीच्या अभावी अशा बातम्या दिल्या जातात, पत्रकार साहेब बी.ए.एम.एस. डॉक्टर म्हणजे बोगस डॉक्टर नाही.
    काही कायदेशीर माहिती हवी असल्यास अवश्य संपर्क साधा.
    डॉ. योगेश्वर चौधरी 9922721222

    जवाब देंहटाएं
  2. पहिली गोष्ट कोणताच डॉक्टर जीव घेत नसतो ...जीव वाचवतो ..न तुम्ही म्हणता की डॉ ने जीव घेतला ...तुम्ही सांगा की डॉ ने जीव कसा घेतला ..??
    आपण म्हणता की बोगस डॉक्टर तर बोगस डॉ कोणाला म्हणता हे तुम्हाला चांगले माहिती ..आहे ...आज काल प्रत्येक जिल्ह्यात बोगस डॉ आहेत त्यांच्या बद्दल कधी लिहता का तुम्ही ??
    जेव्हा काही प्रसंग घडतो तेव्हा तुमचे डोळे उघडतात बाकी काही नाही ..युनानी डॉ पण ऑलोपॅथी ट्रेटमेंट करतात मग ते पण बोगस झाले ना ??

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. हि बातमी आमच्या प्रतिनिधीनी कव्हर केली असुन या संबधीत पिडित पक्षाने त्या डॉक्टरवर गुन्हा नोंदवला आहे..

      हटाएं
  3. Oh Yogesh More..BAMS doctor bogus aahet ka re..12th madhe 90%-100% ghenare MBBS hotat aani 80%-90% ghenare BAMS hotat..tuzya mulacha MBBS cha chance 1-2 Mark ni gelya var tu tyala BAMS la pathavshil ki tuzya sarkha BINDOK ( Bina Dokyacha) banvavshil

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. प्रतिनिधी यांनी बातमीत कुठेहि बि.ए.एम.एस डॉक्टरला बोगस संबोधलेले नसुन बातमीचा अशय बोगस डॉक्टराचा सुळसुळात असा केला आहे..

      हटाएं