लेकरांना प्रेरणादायी व नतमस्तक होण्या लायक आदर्शाची ठिकाणं दाखवून खरी दिवाळी साजरी करूया. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 अक्टूबर 2019

लेकरांना प्रेरणादायी व नतमस्तक होण्या लायक आदर्शाची ठिकाणं दाखवून खरी दिवाळी साजरी करूया.


    दिवाळी  हा सण समाजातील सर्वच घटक मोठ्या थाटामाटात साजरा करतात.  दिवाळी  सण हा सणांचा  राजा  होय. ज्या पद्धतीने अनेक दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून जातो; त्याप्रमाणे नात्यांची वीण विननारा हा सण होय! नात्यांमधील प्रेम ,स्नेह, जिव्हाळा वाढवणारा  हा सण. अगदी बालपणापासून या सणाबद्दल मला आकर्षण राहिलेल आहे. संपूर्ण घराची साफसफाई ,स्वच्छता ,रंगरंगोटी याशिवाय कुटुंबातील सर्व व्यक्तींना नवीकोरी कपडे. वर्षभरात कधी न बनवलेली सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दिपवाळीला आवर्जून केली जातात.त्या फराळाचा आस्वाद घेण असो किंवा फटाक्यांची आताषबाजी असो ही मनाला सदैव मोहणारीच!दिवाळी सणातील महत्त्वपूर्ण म्हणजे दीपोत्सव.दिव्यांच्या प्रकाशाने केवळ आजुबाजुचा परिसरच नाही तर सर्वांच्या मनातील जळमटं दूर होण्याच काम झाल्यासारखं वाटायचं. प्रकाशाने अंधार दूर होतो. असाच प्रकाश आमच्या अज्ञानरूपी अंधाराला दूर करावा आता प्रकर्षाने वाटतं.
     
     *आज सर्वत्र ओरड केली जाते  की,  मुलांनी नतमस्तक व्हावे अशी पाय नाहीत, फुलांचे हार घालावी असे गळे नाहीत. परंतु आपल्याच आजूबाजूला परिसरात अशी नतमस्तक होण्यासारखी माणसं आणि आणि सन्मानाने हार घालावीत असे गळे पण आपल्याला मिळतील. यावर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व स्नेही जणांना आवर्जून सांगावसं वाटतं की ,आपल्या आजूबाजूला अशी अनेक ऊर्जाकेंद्र आहेत ज्ञानकुंभ आहेत ते आपल्या कुटुंबातील परिसरातील लहान लेकरांना दर्शवून द्यावेत. अशा ज्ञानूकुंभाजवळ लेकरांना घेऊन जावं त्यांच्या जीवनात खर्‍या दीपोत्सवाची मेजवानी मिळवून द्यावी. तरच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केल्याचा आनंद घेऊ शकतो.*

      *याची सुरुवात आज प्रयास ,तन्मय ,प्रतीक  गोलू ,अर्णव प्रणव या नातवांना माझ्या वडिलांनी फटाक्याऐवजी पुस्तक देऊन केली..*

    आज प्रत्यक्ष नातवांना घेऊन अनुराग पुस्तकालयात गेल्यानंतर लेकरं अगदी पुस्तकावर तुटून पडली. हे पुस्तक घेऊ का ते पुस्तक घेऊ अशी स्थिती त्यांची झाली. *तन्मने निवडलेलं  बेअर गिल्स यांचं आत्मचरित्र 'चिखल घाम आणि अश्रू' हे पुस्तक पाहून पुस्तकालयाचे मा. अभिजीत जोंधळे अचंबित झाले. त्यांनी तन्मयचे मनभरून कौतुकही केलं.*

*अभिजीत जोंधळे हे व्यक्तिमत्व आज प्रत्यक्ष या लेकरांना अनुभवायला मिळालं. पुस्तकांच्या माध्यमातून समाजाची सेवा करणारा हा अवलिया माणूस अगदी या बालवयात या चिमुकल्यांना पाहायला मिळाला. त्यांच्या सदनी असलेलं अनुराग पुस्तकालय पाहून मुलं अगदी हरखून गेली. सगळ्या प्रकारची कव्हर पेज असलेली पुस्तक व त्यावरील चित्र पाहून प्रयास मोठमोठ्याने हसू लागला. पुस्तकांच्या कव्हर पेजवर असलेली व्यंगचित्र आवर्जून आपल्या आजोबांना दाखवून मोठमोठ्याने हसू लागला. अतिशय निवडक अशी  व समाज मनाला साद घालणाऱ्या पुस्तकांचा संग्रह जोंधळे दादाने ठेवलेला आहे . दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची दुकानात घेऊन न जाता आज पुस्तकांच्या सान्निध्यात मुलांना घेऊन जाऊन एक वेगळा आदर्श आजोबांनी घालून दिला.*

   *तन्मय चे मित्र माननीय 'अमर हबीब' यांची भेट घेण्यासाठी  तन्मय आतुर झाला होता.साधना दिवाळी अंक देऊन त्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर माननीय अमर हबीब काकांनी प्रयास ला त्यांचे 'खरी कमाई' हे पुस्तक देऊन त्याच्या कथेच कौतुक केलं. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या बालपणातील वेगवेगळ्या आठवणी व तन्मयतेने निवडलेल्या पुस्तकांचे भरभरून कौतुक केलं. "एवढ्या बालवयात आत्मचरित्र वाचन करणे हे किती मोलाचा आणि महत्त्वाचा आहे" हे त्यांनी आवर्जून सांगितल. बालवयात वेगवेगळ्या पद्धतीचे बीज लेकरामध्ये रुजवता येतात. वेगवेगळ्या कलागुणांना याच वयात अंकुर फुटतात. त्याची जपणूक करण्याचे काम तुम्ही-आम्ही केलं पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले. एक भन्नाट व्यक्तिमत्व असलेलं ,शेतकऱ्यांसाठी सदैव दंड थोपटणार व्यक्तिमत्व आज या लेकरांना पाहायला मिळालं .या व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श या लेकरांना झाला. शिवाय आम्हा सर्वांची चर्चा ऐकण्याचा योगही या लेकरांना आला. खरतर अमर हबीब  हे आमचं हक्काचं विचारपीठ. अशा विचारपिठांची ओळख याच वयात करून द्यायची नाही तर मग कधी.? आपल्याच आजूबाजूला परिसरामध्ये अनेक प्रकारचे असे ज्ञानकुंभ ,विचारपीठ असताना आपण सैरभैर मनानं इतरत्र ते शोधत फिरतो. याच मार्गदर्शक व्यक्तींचा विशाल हृदय असलेल्या अमुल्य व्यक्तिमत्त्वांचा हा ठेवा अशाच वेगवेगळ्या सणांच्या उत्सवाच्या निमित्ताने का होईना आपल्या लेकरांना वाटून द्यावा असंच मनोमन वाटतंय.*

        हे इथेच नाही थांबलं तर आजोबांनी आज *मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीस्थळाचे दर्शनही आपल्या नातवांना घडवून आणलं. वरुण राजाची कृपा आज मुकुंदराज परिसरामध्ये डोंगरातून वाहणार व  जयवंती नदीत पडणाऱ्या पाण्यास धबधब्याचं स्वरूप आलं होतं .या निमित्ताने या लेकरांना धबधब्याचं रूप कसं असतं हे सुद्धा पाहण्याची संधी  मिळाली. आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या जीवन चरित्रवर आधारित असलेले छोटे-छोटे बॅनर्स यांना वाचता आले. शिवाय 'विवेकसिंधु ' नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला हे आवर्जून आजोबा सांगायला विसरले नाहीत. परिसरातील रेणुकामातेचे मंदिर व प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेला 'हत्तीखाना' याचेही दर्शन याप्रसंगी लेकरांना घडवण्यात आलं.. दगडांमध्ये विशाल कोरीव काम केलेलं पाहून लेकरांची कुतूहल क्षमता जागृत झाली व त्यांनी अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली.*
          *अशाच प्रकारची आपल्या आजूबाजूची समृद्धस्थळ याच लहान वयात लेकरांना दाखवावीत .त्यांच्या सानिध्यात घेऊन जावं व्यक्तिमत्त्वांच्या ओळखी करून द्याव्यात. यापेक्षा दिवाळीतील दीपोत्सव तो वेगळा काय!!*
         
*कराल ना तुम्ही पण.?*
                  नक्कीच लेकरांच्या डोळ्यात दिव्यांचा उत्सव तुम्हाला पाहायला मिळेल.......* *त्यांच्या डोळ्यातील दिव्यांची चमक तुमच्या कुटुंबाला प्रकाशमय केल्याशिवाय राहणार नाही......

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें