शिर्डी प्रतिनिधी:
जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व दोन खासगी व्यक्ती, अशा चौघांना शिर्डी येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
समितीचे उपसंचालक रामचंद्र रतीलाल सोनकवडे (वय 42, रा. आनंद बच्छाव यांचे घर, पकाल रोड काटे गल्ली, द्वारका, नाशिक), समितीचे विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (वय 41, रा. वसंत विहार, बडदेनगर, नाशिक), खासगी चालक विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन (वय 33, रा. नाशिक) आणि मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय 48, प्रयोगशाळा परिचर, आयुर्वेद महाविद्यालय, नगर) अशी कारवाई करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिमती अशी की, धनकवडी (जि.पुणे) येथील एका व्यक्तीने अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी नाशिक विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे अर्ज केला होता. त्यांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी 5 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
यासंदर्भात संबंधित व्यक्तीने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लाचेच्या मागणीची बुधवारी (दि.4) पडताळणी केली. हे पाच लाख रूपये शिर्डी येथील हॉटेल 'साई आसरा'समोर स्वीकारण्याची तयारी उपसंचालक सोनकवडे आणि विधी अधिकारी काकडे यांनी दर्शविली. त्यानुसार शिर्डीतील हॉटेलच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता.
या ठिकाणी उपसंचालक सोनकवडे व विधी अधिकारी काकडे यांच्यासाठी 5 लाख रूपयांची लाच स्वीकारताना विनायक महाजन व मच्छिंद्र गायकवाड या दोघांना गुरुवारी (दि.5) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर उपसंचालक सोनकवडे याच्यासह चौघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना दुपारी अटक करून
कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर, पोलिस निरीक्षक शाम पवरे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, कर्मचारी तन्वीर शेख, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, सतीश जोशी, चालक अशोक रक्ताटे, विजय गंगूल, राधा खेमनर, रवींद्र निमसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
*मागील महिन्यातही नगरमध्ये कारवाई*
ओबीसीचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना याच पथकाने नगरमध्ये एका अधिकार्यावर कारवाई केली होती. जात पडताळणी समिती कार्यालयाच्या तळमजल्यावरच विधी अधिकारी अविनाश विश्वनाथ मगरे यास लाच स्वीकारताना 27 ऑगस्ट रोजी पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे जात पडताळणी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें