सिल्लोड (प्रतिनिधी)दि 14/07/2019.
सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावाजवळील पुलात दणक्या पावसामुळे काडी - कचरा - गाळ अडकल्यामुळे पावसाचे पाणी पुलावरुन वाहून जात असल्यामुळे हा पुलही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला असुन पुरामुळे येथील नागरिक - विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागत असुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित रस्ता बांधकाम अधिका-यांनी वेळीच लक्ष केंद्रित करुन पुलाची दुरुस्ती करण्यात यावी असी मागणी बोदवड येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी - बोदवड - खंडाळा रस्त्यावर पावसामुळे ठिक ठिकाणी मोठ मोठी खड्डे पडल्याने वाहनधारकांना खुपच ञास सहन करावा लागत आहे. अनेकदा तर लहान - मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक दुचाकी वाहनधारकांना कंबरदुखी लागली आहे.
अशाच परिस्थितीत बोदवड गावाजवळील पुलात दणक्या पावसामुळे काडी - कचरा - गाळ अडकल्यामुळे पावसाचे पाणी पुलावरुन वाहून जात असल्यामुळे हा पुलही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला असुन पुरामुळे येथील नागरिक - विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता संबंधित अधिका-यांनी वेळीच लक्ष केंद्रित करुन पुलाची दुरुस्ती करुन सराटी - बोदवड - खंडाळा रस्त्यावरील जीवघेणी खड्डे तात्काळ बुजण्यात यावे असी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगण पाटील ठाले, राहूल पाटील गव्हाणे, आत्माराम गुळवे, अशोक गायकवाड, चंद्रशेखर गुळवे, शिवाजी शेळके, समाधान गायकवाड, पंढरीनाथ चव्हाण, योगेश गुळवे, अनिल गुळवे, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें