परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव; अस्वच्छेतेचे साम्राज्य. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 मार्च 2019

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव; अस्वच्छेतेचे साम्राज्य.

प्रतिनिधी.परभणी.दि.19/03/2019.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालये अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून रुग्णालयात ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, औषधांचा तुटवडा जाणावत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयातील एमआरआयची मशीन अनेक दिवसांपासून धुळखात पडून आहे. रुग्णालयात सफाई कामगार असूनही स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. दररोजची रुग्णसेवा ही केवळ नावालाच उरली असल्याचे चित्र असून रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना सेवा उपलब्ध करुन दिली जात नाही. याबद्दल अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. सर्वात गंभीरप्रश्न पिण्याच्या पाण्याचा असून रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याने रुग्णांवर उपचार वेळेत केले जात नाहीत. रुग्णांना बाहेरगावी उपचारार्थ पाठविण्यासाठी विशेष भर दिला जातो. या रुग्णालयात ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण येतात. ओपीडीला रांगाच रांगा असून रुग्णांची व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याचे दिसून येत असून रुग्णांचे निदान करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. योग्य उपचार मिळत नसल्याच्या कारणाने अनेकांना अखेर खाजगी रुग्णालयाकडे वळण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ फी आकारणी केली जात आहे. ती सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने रुग्ण नाईलाजास्तव जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायरी चढतो. या रुग्णालात गेल्यानंतर बॅन्डेज पट्टीपासून ते रुग्णास लागणारी कोणतीच औषधी रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे कारण सांगत अनेक डॉक्टर्स रुग्णांना बाहेरुन औषधी आणण्यास भाग पाडतात.
रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णालयातील अनेक कक्षात दुर्गंधी पसरली आहे. अनेक कोपऱ्यांमध्ये कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत. या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासन देखील नित्याची बाब म्हणून दुर्लक्ष करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रुग्णालयातील अनागोंदी कारभारास आवर घालावा, अशी मागणी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या रुग्णालयाच्या कारभाराबाबत माजी आरोग्यमंत्री फौजिया खान यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली होती. अनेक विभागाचा कारभार राम भरोसे झाला आहे.
रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर रुग्णसेवक यांच्यावर रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. परिणामी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक समस्यांच्या विळख्यात जिल्हा सामान्य रुग्णालय असून वेळीच कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरु लागली आहे. रुग्णांना याबाबत अनेक तक्रारी करुनही काहीही उपयोग होत नसल्याने संपूर्ण कारभार ढेपाळला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान   या जिल्ह्य सामान्य रुग्णालयातील गोर गरिब रूग्णांनाची होणारा त्रास व हेळसांड थांबवा *अन्यथा मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या* वतीने या विरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देण्यात येईल याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें