विद्यार्थ्यांनी गरुडासारखी गगनभरारी घेण्याकरीता संधीचं सोनं कराव - आरटीओ खान.
शिर्डी, प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे,
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, येथील राजकारण विरहित सर्वधर्मीय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशन आयोजित थोर देशभक्त, समाजसुधारक, आणि वीर शहिदांच्या चित्रांवर अधारीत शालेय विद्यार्थ्यांकरीताच्या भव्य तालुकास्तरीय "रंगभरण आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेचा बक्षिसे व पारितोषिके वितरण समारंभाचा कार्यक्रम प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून, मेनरोडवरील आझाद मैदान याठिकाणी नुकताच संपन्न झाला, यावेळी श्रीरामपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए ए खान, राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाशराव कुलथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिनभाऊ गुजर, श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष, अॅड. श्री. रोकडे भाऊसाहेब, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन "महिला समुपदेशन केंद्र प्रमुख, विद्याताई क्षीरसागर, कुटे मेमोरियल फौंडेशन चे डॉ. रविंद्र कुटे, मुफ्ती रिजवानूल हसन सहाब, उम्मती फाऊंडेशनचे अध्यक्ष सोहेलभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरमाई शेख, नगरसेवक राजेंद्र पवार सर, नगरसेवक हाजी मुखतारभाई शहा, नगरसेवक अॅड. संतोष कांबळे, नागेशभाई सावंत, विजयराव नगरकर, सलिमखान पठाण सर, श्रीरामपूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे श्री. रासकर, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश कुंकुलोळ, सामाजिक कार्यकर्ते सागर तलवार, भोसले, आदीक, सामाजिक कार्यकर्ते विजयराव खाजेकर, श्रीरामपूर रेशन दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष माणिकराव जाधव,
भारत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे हाजी इसाकभाई शेख, एस एस विमा केंद्राचे सलाऊद्दीनभाई शेख
आदी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी आरटीओ खान म्हणाले की आम्ही पण लहानपणी शास्त्र आणि गणित विषयात पुढे असायचो मात्र चित्रकलेत मागे, म्हणून कधी कधी गुरुजींच्या छडीचा प्रसाद खावा लागायचा,आता तसे नसले तरी विद्यार्थ्यांनी स्वउमेदीने स्वतःत गगनभरारी घेणारे गुण निर्माण करावे कारण समता फाऊंडेशनने या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गरुडझेप घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त करुन दिली आहे, एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं असेही ते म्हणाले.
यावेळी अनुराधाताई आदिक, सचिन गुजर, श्री. रासकर, डॉ. रविंद्र कुटे, आदींची भाषणे झाली,
या कार्यक्रमास हापिज युनुसभाई जमादार सहाब ,रियाजभाई कॉन्ट्रॅक्टर, हाफिज मौलाना जोहरअली सहाब, सामाजिक कार्यकर्ते माजी psi बाबुराव सौदागर, सामाजिक कार्यकर्ते फारुकभाई शेख, समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख तथा समता फाऊंडेशन वर्किंग कमिटी सदस्य सर्वश्री अॅड. मोहसीन शेख, डॉ. मयुरेश कुटे पाटील, अॅड. दर्शन पवार, मोहम्मद हुसैन खाटीक, मुदस्सीर शेख, अॅड. अभिजित ठाकूर, वाहिद खान, अॅड. जगमितसिंग गुलाटी, एजाज शहा सर, अकबर शेख, अॅड. शामली वैष्णव, शिवानी पाठक, अर्चना भालेराव, हेमंत गुप्ता, अल्फैज सय्यद, समशेरखान, , अल्फैजखान (मोनु) नाजिम शेख, अमिर मेमन,हाशम चाऊस, सलमान पटेल, गयाजखान,
कॉमन न्यूजचे संपादक अल्ताफभाई शेख, एस न्यूज वृत्तवाहिनीचे जयश सावंत, तिरंगा न्यूजचे हिंगमिरे, पत्रकार विठ्ठलराव गोराणे, हमीदभाई चौधरी, कलिमभाई शेख, बाबा शेख, महेबूब शेख, अन्वर सर, आदी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, स्मृतिचिन्ह तथा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,
या कार्यक्रमास तालुकाभरातील शालेय विद्यार्थी /विद्यार्थीनी शिक्षक, शिक्षिका, पालक,महिला भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धा आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समता फाऊंडेशन वर्किंग कमिटी ने मोठे परीश्रम घेतले,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅंड. मोहसीन शेख यांनी केले तर सूत्रसंचालन समशेरखान व अभार डॉ. मयुरेश कुटे पाटील यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें