फळा येथे नववर्ष व दीपावली पाडव्या निमित्ताने 'पाडवा कवितेचा' या एक दिवशीय कवी संमेलन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 नवंबर 2018

फळा येथे नववर्ष व दीपावली पाडव्या निमित्ताने 'पाडवा कवितेचा' या एक दिवशीय कवी संमेलन संपन्न.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०९नोव्हेंबर २०१८.
पालम तालूक्यातील मौजे फळा येथील कै.वामनराव सार्वजनिक वाचनालय येथे संत जनाबाई साहित्य मंडळ गंगाखेड व कै.वामनराव सार्वजनिक वाचनालय फळा यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्ष व दीपावली पाडव्या निमित्ताने 'पाडवा कवितेचा' या एक दिवशीय कवी संमेलनाचे आयोजन दि.०८ नोव्हेंबर रोजी श्री संत मोतीराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र फळा ता.पालम याठिकाणी करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर हे होते, तर उद्घाटक म्हणुन जिल्हा ग्रंथालय अधिकार बालाजी संभाजी कातकडे यांची उपस्थिती होती. माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. कालिदास गुडदे आणि मराठा सेवासंघाच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्य आनंतराव शिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संत जनाबाई साहित्य मंडळ गंगाखेड यांच्या वतीने आयोजित कवी संमेलनाचे हे पाचवे वर्ष होते. "पाडवा कवितेचा" या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी माजी प्राचार्य डॉ. दिनानाथ फुलवाडकर हे होते. यावेळी जिल्ह्यातील नामांकित कविंनी त्यांच्या रचना यावेळी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ व संत जनाबाई साहित्य मंडळाच्या वतीने कै.वामनराव सार्वजनिक वाचनालयास ग्रंथभेट देण्यात आली.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी संत जनाबाई साहित्य मंडळाचे सर्व सदस्य, महेश कोरडे, आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें