सेलू प्रतिनिधी
सेलू येथील सरोदे नगर बुधवार रोजी रात्री चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोऱ्या करून फरार झाले आहेत. सविस्तर माहिती अशी की, सेलुत अनेक ठिकाणी घरबंद असलेल्या घरामध्ये चोऱ्या झाल्या असून प्रत्येक घरातील सोन्यांचे ऐवज व पैस्यांची चोरी झाली आहे. यामध्ये कुठलीही जिवितहानी झालेली नाही.परंतु चोरट्यांनी जवळपास 40 हजारापेक्षा जास्त पैसे लंपास केले आहेत. चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल चार घरफोड्या करून घरातील पैसे घेऊन फरार झाले आहेत. यामध्ये 1) दिपक निकाळजे सर्वोदय नगर 2 ) सुनिल पांडुरंग जाधव 3) रवी भाऊसाहेब बरकूले अशा तिन ते चार जनांचे घर फोडण्यात या शातीर चोरट्यांना यश मिळाले. असुन पिडितांनी आज गुरुवार रोजी साडेअकरा वाजता सेलू पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर सेलूत नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें