सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१६) -
युवकांनी लहानपणापासूनच व्यायाम करून
आपले शरीर तंदुरुस्त ठेवून शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे. आजघडीला मोठयाप्रमाणात युवकांची पिढी दिवसेंदिवस व्यसनाधिन होत असल्याची खंत त्यानी व्यक्त करीत युवकांनी व्यसनापासून स्वताला दूर ठेवावे.असे
आवाहन केले.
सिल्लोड नगरपरिषदअंतर्गत आपल्या परिसरातील नागरिकांसाठी व्यायाम शाळा सुरू करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यायाम शाळा भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.
सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी,शिवाजी नगर परिसरात नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या व्यायाम शाळेचे भूमिपूजन आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे ,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे ,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ , नगरसेवक रउफ बागवान,राजेंद्र गौर,शेख बाबर बागवान ,लड्डू पटेल, सतीश ताठे , संजय मुरकुटे, डाँ...... , पपींद्रसिंह वायटी महाराज, मनोज झंवर, मतीन देशमुख, संजय फरकाडे, उदय तायडे, मधुकर बेंडाळे, राजू बागवान, गणेश डकले, राजेश्वर आरके, पंजाबराव चव्हाण, फईम पठाण, जगन्नाथ कुदळ, रवि आरके यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें