ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक शिक्षणांची ज्योतिदायकीतेला मिळाले न्याय.
जिंतूर प्रतिनिधी, शेख अलीम.
आझाद क्रीडामंडळ परभणीच्या वतीने दिला जाणारा आदर्श समाजरत्न मुख्याध्यापक पुरस्कार तालुक्यातील चारठाणा येथील अल्पसंख्याक तुराबूल हक्क उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख अखिल अहेमद मोइनोद्दीन यांना आमदार बाबजानी दुराणी,माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते बी. रघुनाथ सभागृहात रविवार दि १६ सप्टेंबर रोजी देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबजानी दुराणी उदघाटक म्हणून माजी राज्य मंत्री फौजिया खान, प्रमुख पाहुणे म्हणून विष्णूं नवले पाटील,गौस झैन, जलील पटेल,रशीद मास्टर,मन्सूरखा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिना निमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संयोजक वरिष्ठ पत्रकार महेमुद खा व अध्यक्ष मोईन खान यांच्या वतीने करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक ,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला.या वर्षी शेख अखिल अहेमद यांना जो मागील १५ वर्षापासून ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थीयांवर अथक परिश्रम घेऊन मुस्लिम समाजात शिक्षणाची ज्योति देण्याचे जो कार्य केले आहे त्या कार्याची इतरांनी पण प्रेरणा घ्यावे व त्यांना हि प्रोत्साहित करावे या भावनेतुन हे पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन मधुकर उमरीकर तर आभार प्रा अरुण पडघन यांनी मानले
त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्था अध्यक्ष अन्वर पाशा देशमुख, सचिव अथर पाश देशमुख,सरपंच बी जी चव्हाण,गट शिक्षण अधिकारी आम्ले,डॉ अ.रहिम,मुख्याध्यापक अ रशीद ,मुख्याध्यपक मो.खालेद, शेख फारूक अहेमद,मसूद पठाण,नवाज कुरेशी,साजिद ठेकिया,अबूबकर चाऊस, प्राचार्य शाहेद ठेकिया,अ सिद्दीक,अ बारी,शेख अझर,मो इलियास,मिर्झा शाकेर, अ मजिद,शेख मकसूद अहेमद,शेख जलील अहेमद,,मो साजेद आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

क्या बात है मुबारक अखिल सर
जवाब देंहटाएं