नगराध्यक्षांना राखी बांधून विद्यार्थीनींनी साजरा केला रक्षाबंधन; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

नगराध्यक्षांना राखी बांधून विद्यार्थीनींनी साजरा केला रक्षाबंधन;



सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२७ ) -
सिल्लोड शहरातील विविध शाळा - महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांना राखी बांधून युवतींसह शहरातील महिला भगिनींचे शहरातील प्रथम नागरिक या नात्याने बंधू पालक म्हणून रक्षण करावे अशी बंधूत्वाची जबाबदारी रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधून त्यांच्यावर टाकली आहे.
सिल्लोड येथील नगरपरिषद कार्यालयात सिल्लोड शहरातील शाळा - महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी मोठ्या संख्ये एकत्र येऊन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे त्यांनी औक्षण करुन राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील सर्व समाज गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदत आहे.शहरातीलच नव्हे तर सर्व आई - भगिनींचे रक्षण करणे हे आपले नागरिक म्हणून आद्य कर्तव्य असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी राजरत्न निकम, सिल्लोड शहरातील सिंधू मेमोरियल विद्यालयाचे शिक्षक - मंजीत श्रीवास्तव, संदीप सपकाळ, रामराव अपार, सुरेश व्यवहारे, सुरेश अमृते, तसेच विद्यार्थीनी - श्रृष्ठी गाढे, कोमल गव्हांडे, उषा गाडेकर, आरती मिरगे, कोमल गाडेकर, अश्विनी जैस्वाल आदींसह मोठया संख्येने विध्यर्थिनींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें