राहाता तालुक्यात ९ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 अगस्त 2018

राहाता तालुक्यात ९ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम.


शिर्डी (प्रतिनिधी) राजेंद्र दुनबळे
मराठी क्रांती मोर्चाचा ९ऑगस्ट रोजी चक्का जाम अंदोलन होणार असुन राहाता तालुक्यातही चक्का जाम होणार आहे ,मराठा समाजास आरक्षणाची मागणी गेल्या २वर्षा पासुन मराठा समाज क्रांती मुक मोर्चाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या मागण्या सत्तात्याने सरकारपुढे मांडत आहे परंतु महाराष्ट्र सरकार या आंदोलनाकडे चालढकल पणा करत आहे.हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने होणार आहे लातुर येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापीत बैठकीत ठरल्याप्रमाणे दि.९ ऑगस्ट २०१८रोजी सकाळी ९ते सायं ५वा.सुमारास संपुर्ण राज्यात एकाच वेळी त्या त्या गावात तालुक्यात व जिल्ह्यात होणार आहे तरी सकल मराठा समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान समाजाच्या वतीने केले आहे
या काळात आत्यअवशक सेवा सुरु रहाणार असुन विद्यार्थ्यांची गैर सोय होऊ नये म्हणुन शालेय व्यवस्थापनाला शाळा बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे जो पर्यंत मागन्या मान्य होत नाही तर हे आंदोलन बेमुदत सुरूच राहाणार आहे या संदर्भात दि.४ऑगस्ट रोजी राहाता तालुका सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली होती( निर्माळ पिपरी बायपास) (निर्माळ पिपरी चौक)(निमंगाव बायपास) लोणी आणि कोल्हार चौक या ठिकाणी चक्का जाम आंदोलन होणार आहे  या आदोलनात महिला. मुली. तरुण. आबालवृद्ध. गुराढोरांसह उपस्थीत रहाणार आहे या मागनीचे निवेदन राहाता तालुक्यातील पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें