![]() |
| संग्रहित फोटो |
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे )
जिंतूर - औरंगाबाद महामार्गावर चारठाणा पासुन आठ किमीच्या अंतरावर असलेल्या देवगाव फाटा येथे असलेल्या महामार्ग पोलीस मदत केंद्रावर दिवसाढवळ्या इतर जिल्ह्यासह परराज्यातील वाहनधारकांची मुस्कटदाबी करून कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली पैसे उकल्या जात आहे. शिवाय येथील कर्मचारी शुक्रवार मंठा आठवडी बाजारासाठी जाणारी वाहने आडवुन पैशासाठी अडवणूक करीत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महामार्ग चे वरीष्ठ अधिकारी कानाडोळा करीत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिंतुर औरंगाबाद महामार्गावरून जाणार्या आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आशा महत्वपूर्ण राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी जड वाहनांसह इतर वाहनांची प्रचंड प्रमाणात वर्दळ सुरू असते. या वाहनांना रस्त्यावर कोठे प्रसंग उद्भवल्यास चारठाणा पासुन आठ किमीच्या अंतरावर देवगाव फाटा रस्त्यावर महामार्ग पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्रावर ४ ते ५ कर्मचारी सह काही खाजगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र रस्त्यावर अपघात झाल्यानंतर कोठेही महामार्ग पोलिस कर्मचारी वेळेवर पोचत नाहीत, असा अनुभव नागरिकांना अनेकदा आलेला आहे. रस्त्यावर मदत केंद्राचा मोबाईल नंबर असलेले फलकही लावलेले नाहीत. कारण येथे नियुक्तीवर असलेले अधिकारी क्वचितच कर्तव्यावर येत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही परिणामी ह्या कर्मचाऱ्यांनी मदती ऐवजी इतर जिल्ह्यांसह परराज्यातील वाहनधारकांना कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली सर्रासपणे आर्थिक लुटण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर ह्या कर्मचाऱ्यांनी रात्री व दिवसाच्या पाळीमध्ये वाहनधारकांची आर्थिक लूट करण्यासाठी ३ ते ४ खाजगी कर्मचारी नियुक्त केले आहे. मात्र येथे कर्तव्यावर असलेले अधिकाऱ्याच्या डोळ्यासमोर चालत असलेल्या बेकायदेशीर खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि वाहनधारकांची आर्थिक लूट सुरू असतांना ही केवळ बघ्याची भूमिका घेतात यामाघील रहस्य काय आहे हे अद्यापपर्यंत कोणाला कळू शकले नाही.
वरिष्ठाच्या उपस्थितीत पोलीस मदत केंद्राला कुलुप! --- देवगाव फाटा येथे उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राला वरिष्ठाचा या मार्गावरून दौरा असल्यास कुलुप लावल्याचे आढळून येते. मागील आनेक वर्षा पासून देवगाव फाटा येथे वाहने तपासणीच्या नावाखाली मोठया प्रमाणावर पैसे उकल्या जात असुन एखाद्या चालकांकडे पैसे नसल्यास त्याला दमदाटी केल्याचे आनेक प्रकरणे या मार्गावर घडले आहेत. दरम्यान देवगाव फाटा येथे सुरू असलेल्या पोलीस मदत केंद्राला खरोखरच मान्यता आहे का यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
अवैध धंदेचालकांचे महामार्ग केंद्राशी साटेलोटे -जिंतूर तालुक्यातील अवैध धंदे चालक अधिकचे पैशे जमवून स्वतःच्या तुंबळ्या भरण्याकरिता आपला माल चढ्या दराने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेतात. यामध्ये वाळू, शासकीय धान्य, साग आदी अवैध धंद्यांचा समावेश आहे. आणि ह्या अवैध धंद्यांची तस्करी या महामार्ग केंद्रावरून होत असते. मात्र अवैध धंदे चालक माहामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचार्यांशी आर्थिक साटेलोटे करून बिनधास्तपणे मोठ्या प्रमाणात अवैध मालाची तस्करी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें