शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावं, शरद पवारांचे आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावं, शरद पवारांचे आवाहन.

शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावं, शरद पवारांचे आवाहन.

नोटाबंदीने सामान्य नागरिक, आया-बहिणी भिकेला लागल्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अजूनही झालेली नाही. देशात कुणीही सुखी नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. भाजपाचा जर पराभव करायचा असेलतर शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत सामील व्हावे असे आवाहन करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची बेरीज झाली तर भाजपाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुलेंच्या पगडीचा वापर करण्याची सूचना करत छगन भुजबळ यांना फुलेंची पगडी घातली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भुजबळ यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला होता.सत्तेचा मस्तवालपणा राष्ट्रवादीने कधीच दाखवला नाही, असे सांगत भाजपाचे पालघरचे यश हे खरे नव्हे.भाजपासोडून देशातील सर्व पक्षांनी एकत्र यावे. आपण सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाला भेटून इव्हीएम बंद करून जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्याची विनंती केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें